Pune loksabha Constituency  sakal
पुणे

Pune loksabha Constituency : ‘कसबा पॅटर्नच्या पुनरावृत्तीचा निर्धार’

‘कसबा पॅटर्न’ची पुनरावृत्ती करून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार गुरुवारी मेळाव्यात करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘कसबा पॅटर्न’ची पुनरावृत्ती करून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार गुरुवारी मेळाव्यात करण्यात आला. धंगेकर यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी केसरीवाडा येथे मेळाव्याचे आयोजन केले होते.

या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ विद्यमान आमदार धंगेकर यांचे ‘होम पीच’ आहे. पोटनिवडणुकीत त्यांनी लक्षणीय मतांनी विजय मिळवला. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

मेळाव्यात नवा वाद

काँग्रेसमधील अंतर्गत विसंवाद मिटण्यास तयार नाहीत. हे मेळाव्यात पुन्हा एकदा दिसून आले. मेळावा सुरू झाल्यानंतर रोहित टिळक हजर झाले. त्यावेळी अरविंद शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला. याबाबत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : बेळगावात आज काळा दिन फेरी, मराठी ताकद दाखवण्याचे म. ए. समितीचे आवाहन

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

Panchang 1 November: आजच्या दिवशी देवीला बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा

Seat Sharing: MVA मधील जागा वाटपाचा वाद कसा मिटणार? शरद पवारांनी सांगितला प्लॅन 

SCROLL FOR NEXT