बारामती : ''धनंजय मुंडे यांचा प्रश्न हा वैयक्तिक स्वरुपाचा आहे, यात तपास सुरु आहे, पोलिस तपास करीत आहेत. जो पर्यंत सर्व तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत या विषयावर बोलणे उचित होणार नाही. पक्षाचे नेते या बाबत योग्य निर्णय करतील. मात्र धनंजय मुंडे यांनी स्वतःहून सर्व परिस्थिती सर्वांसमोर ठेवली आहे. त्यामुळे जे 'जेन्युयन' आहेत, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
''मुंडेविरोधात जर कोणी व्यक्ती षडयंत्र करत असेल तर, त्यात खोलात जाण्याची गरज आहे. त्यांच्या मनात खोट असती तर ते व्यक्त झाले नसते, पण ते व्यक्त होतात याचा अर्थ समजून घ्यायला हवा की ती व्यक्ती जेन्युयन आहे.'' असेही ते म्हणाले.
आज लिमटेकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथे रोहित पवार यांनी सपत्नीक ग्रामपंचायत निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राजेंद्र पवार व सुनंदा पवार यांनीही या प्रसंगी मतदानाचा हक्क बजावला.
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. धनंजय मुंडे यांच्या बाबत त्यांनी मत व्यक्त करताना, ''मुंडे यांचे नाव खराब करण्याचा किंवा त्यांना ब्लँकमेल करण्याचा प्रयत्न होतोय की काय असे वाटते आहे, मात्र जो पर्यंत पोलिसांचा तपास पूर्ण होत नाही, तो पर्यत काही बोलता येणार नाही'' असे रोहित पवार म्हणाले.
पुण्याच्या दक्षिण भागाला आता दररोज पाणीपुरवठा
''नबाब मलिक यांच्या जावयाबाबत त्यांनी स्वतःच न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला असल्याने या बाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक बोलता येईल,'' असेही रोहित पवार म्हणाले.
''कर्जत जामखेडमध्ये शंभरहून अधिक ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे, यात नव्वदहून अधिक ग्रामपंचायतीत दोन्ही पॅनेल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आहेत. वीस ग्रामपंचायतीत भाजप विरुध्द राष्ट्रवादी व काँग्रेस यात लढत होते. दहा ते बारा ग्रामपंचायतीत भाजपचे वर्चस्व आहे, माझ्यासाठी याच ग्रामपंचायती अधिक महत्वाच्या आहेत, तेथे परिवर्तन घडेल'' असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधी सर्वात शेवटी लस घेणार...
''कोरोनाची लस कोरोनायोध्दयांना सर्वप्रथम दिली जाणार आहे, त्या नंतर टप्याटप्याने लसीकरण होणार आहे, कोणीही घाई करु नये, यात लोकप्रतिनिधी सर्वात शेवटी लस घेतील, सर्व प्रथम लोकांना लस मग लोकप्रतिनिधींनी घ्यावी,'' असा विचार आम्ही करत असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.