बारामती - धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी धनगर बांधवांच्या वतीने बारामतीत गुरुवारपासून (ता. 9) आमरण उपोषणास प्रारंभ झाला.
महाराष्ट्रातील धनगर समाज अनेक वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. यासाठी आंदोलन, उपोषण व मोर्चे काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली.
जे सरकार सत्तेच्या बाहेर असते तेव्हा ते सरकार धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणते, तेच सरकार धनगर समाजाच्या मतांवर सत्तेत बसते तेव्हा ते मूग गिळून गप्प बसते. यामुळे समाजात असंतोष पसरला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
चौंडी येथे दोन महिन्यांपासून उपोषण करत असलेल्या धनगर बांधवांना एसटी प्रवर्ग आरक्षणाच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले गेले होते, प्रत्यक्षात सरकारने काहीही हालचाल केलेली नाही.
यामुळे बारामतीतील प्रशासकीय भवना समोर सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. सरकारने या उपोषणाची तातडीने दखल घेण्याची मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
उपोषणस्थळी विश्वास देवकाते, किशोर मासाळ, संपतराव देवकाते, ज्ञानदेव बुरुंगले, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष अँड. जी. बी. गावडे, शशिकांत तरंगे, बापूराव सोलनकर, कल्याणी वाघमोडे, गणपत देवकाते, राजेंद्र बोरकर, अविनाश भिसे, गोविंद देवकाते, विठ्ठल देवकाते, नवनाथ मलगुंडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.