Dhirendra Krishna Shastri esakal
पुणे

आम्ही मराठ्यांसोबत...; बागेश्वर महाराज यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा तर अंनिसला हाजमोला गोळी खाण्याचा सल्ला

रोहित कणसे

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. यादरम्यान पुण्यात कार्यक्रमासाठी आलेल्या बागेश्वर महाराज यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणाला माझा पाठींबा असल्याची घोषणा बागेश्वर महाराज यांनी केली आहे. मराठ्यांच्या बरोबर आम्ही आहोत, मराठा आरक्षणाला माझा पाठींबा आहे, असे बागेश्वर महाराज म्हणाले.

लोकांना सनातन संस्कृती विषयी जागरुक करायला आलो आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच संत तुकाराम महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यासाठी मी माफी मागतो असेही बागेश्वर महाराज म्हणाले. जसा वेळ मिळेल तसे मी तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देखील जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बागेश्वर महाराज यांनी त्यांचा विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, विरोध करण्याऱ्यांना कोण थांबवणार. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हाजमोलाची गोळी खावी. तसेच त्यांनी सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन आतापर्यंत दोनच राजकारणी माझ्याकडे आले आहेत असेही माध्यमांशी बोलताना सांगितले.

धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर महाराज यांनी मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी देखील भूमिका मांडली होती. मनातलं ओळखणं वेगळं असतं आणि अधिकारांवर बोलणं वेगळं असतं. भारत जेव्हा गुलामीत होता तेव्हा मराठ्यांना शौर्य दाखवून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यामुळे बागेश्वर पीठ मराठा समाजाबांधवांच्या सोबत आहे. त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, असे ते म्हणाले होते. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT