diesel theft alephata police seized worth rs 17 lakh pune crime Sakal
पुणे

Pune Crime News : डिझेल चोरणा-या टोळीस आळेफाटा पोलीसांनी केले जेरबंद

जुन्नर व आंबेगाव तालुक्यात डिझेल चोरणा-या टोळीस आळेफाटा पोलीसांनी जेरबंद करत १७ लाख ५२ हजार ४११ रूपयांचा मुद्देमाल केला जप्त

सकाळ वृत्तसेवा

राजेश कणसे

आळेफाटा : जुन्नर व आंबेगाव तालुक्यात डिझेल चोरणा-या टोळीस आळेफाटा पोलीसांनी जेरबंद करत १७ लाख ५२ हजार ४११ रूपयांचा मुद्देमाल केला जप्त याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दि.८ एप्रिल रोजी रूपेश ज्ञानेश्वर वाळुंज वय ३० वर्षे व्यवसाय ट्रान्सपोर्ट रा. वडगांव आनंद यांनी फिर्याद दिली होती

की दि ३ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास आळेफाटा या ठिकाणी असलेल्या भोसले पेट्रोल पंपाचे समोर स्वताच्या मालकीचे टाटा कंपनीचे हायवा ट्रक नं. एम.एच.४०/सी.डी/५०३८ हिचे कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने डिझेल टाकीचे झाकण तोडुन त्याद्वारे टाकीमध्ये असणारे ६० लिटर डिझेल तसेच योगेश मुरलीधर पाडेकर व सुदर्शन संजय जाधव यांचे सुध्दा बायपास ब्रीजचे जवळ लावलेल्या गाडयांमधुन डिझेल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती

त्यानुसार सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान दाखल गुन्ह्याचे तांत्रिक विष्लेशन करीत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की १) कुणाल रोहीदास बोंबले २) ओमकार काळुराम देवकर ३) राहुल संजय हिंगे

सर्व रा. राजगुरूनगर ता. खेड जि.पुणे हे असे डिझेल चोरीचे गुन्हे करीत असुन त्यांनीच सदरचा गुन्हा केला असावा अशी बातमी मिळाल्याने राजगुरूनगर ता. खेड जि. पुणे येथे जावुन सदरचे संशयित इसमांचा त्यांचे दिले पत्यावर शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांच्याकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा येथे डिझेल संदर्भाने गुन्हा केला

असल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनचे हद्दीत डिझेल चोरल्याचे कबुल केले असुन मंचर व पारगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये देखील गुन्हे दाखल आहेत.

त्यांच्याकडुन चोरलेले डिझेल हे भाड्‌याने घेतलेल्या वाकळवाडी ता. खेड जि. पुणे येथील खोलीमधुन चोरीस गेलेल्या एकुण डिझेलपैकी ५७५ लिटर डिझेल जप्त केले असुन गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार व इर्टीगा कार सुध्दा सदर गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आली आहे.

त्यांचेकडुन स२ंएकुण ४ गुन्हे उाडकीस आले असुन एकुण १७,५२,४११ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी हि पुणे ग्रामीण चे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर प यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस हवालदार भिमा लोंढे, पोलीस नाईक पंकज पारखे, पो.कॉ. अमित माळुंजे, पो. कॉ. हनुमंत ढोबळे, पो.कॉ.प्रविण आढारी, पो.कॉ. नवीन अरगडे, यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT