पुणे

डिजिटल मार्केटिंग बूट कॅम्प

CD

पुणे, ता. ९ : रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंगची कौशल्ये शिकवणारा विशेष बूटकॅम्प २४ जूनपासून सुरु होत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात तर ‘मार्केटिंग’चे अधिकच महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित तीन दिवसीय ऑनलाइन बूट कॅम्प आयोजिला आहे. यामध्ये सर्च, डिस्प्ले, रीमार्केटिंग, युट्युब, सोशल मीडिया, लीड जनरेशन, कन्व्हर्जन, पेज लाईक इत्यादी कॅम्पेन कसे चालवावे, लिंक्डडीन, कॅन्व्हा, चॅटजीपीटी यांचा डिजिटल मार्केटिंगमध्ये कसा उपयोग करावा, याची माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ९१३००७०१३२


रेरा नोंदणी, महारेराच्या सेवा
प्राप्त करा एकाच ठिकाणी
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची (महारेरा) अधिकृत प्रशिक्षण संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’तर्फे प्रशिक्षणासोबतच ‘महारेरा नोंदणी व सल्ला सेवा’ देण्यात येत आहेत. यामध्ये महारेरा एजंट नोंदणी- वैयक्तिक परवाना, महारेरा एजंट नोंदणी- कंपनी परवाना, महारेरा प्रकल्प नोंदणी, महारेरा एजंट नोंदणीचे नूतनीकरण, अर्धवार्षिक अहवाल (फॉर्म ६), महारेरा परीक्षा फॉर्म भरणे इत्यादी सेवांचा व महारेरा संदर्भात सल्ला देण्याच्या सेवेचा समावेश आहे. महारेरा प्रशिक्षणासोबत या सेवांचा लाभ घेतल्यास एजंटना शुल्कात आकर्षक सवलत मिळणार आहे. सोबतच डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा, सेल्स मार्केटिंग कार्यशाळा, नियमित आयटी सपोर्ट व नियमित रेरा अपडेट्स मिळणार आहेत.
संपर्क : ७३५०००१६०३, ८९५६३४४४७५

वाईल्डलाईफ फोटोग्राफी
प्रमाणपत्र प्रशिक्षण
वाईल्डलाईफमध्ये काम करत असलेली ‘नेमोफिलिस्ट’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकेंडला चालणारे चार दिवसांचे वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रशिक्षण १६ जूनपासून आयोजिले आहे. प्राण्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात फोटो काढण्याचे आवश्यक तंत्र, रचना, प्रकाशयोजना, कॅमेरा सेटिंग्ज, पोस्ट प्रोसेसिंग, वन्यजीवांचे छायाचित्र काढताना, प्राणी व पर्यावरणाला कमीतकमी त्रास होईल याची खात्री करून, नैतिक पद्धती आणि जबाबदार वर्तनाने फोटोग्राफी कशी करावी आदी बाबी प्रात्यक्षिकासह अनुभवी वन्यजीव छायाचित्रकारांकडून शिकायला मिळणार आहेत. क्लासरूम ट्रेनिंगसह नैसर्गिक अधिवासांमध्ये हँड्स-ऑन फोटोग्राफी सत्रे प्रशिक्षणादरम्यान होणार आहेत.
संपर्क : ८९५६३४४४७२

अ‍ॅव्होकॅडो व्यावसायिक शेती
अ‍ॅव्होकॅडोची व्यावसायिक शेती भारतात फायद्याची ठरत आहे. निर्यात आणि आरोग्य जागरूकतेने तसेच अ‍ॅव्होकॅडोमधील उच्च पौष्टिक सामग्रीमुळे हे फळ शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायद्यात आणण्यास सक्षम आहे. या फळाची यशस्वीपणे लागवड व विक्री करून नफा कसा मिळवावा याची माहिती देणारी ऑनलाइन कार्यशाळा १२ जूनला आयोजिली आहे. यात अ‍ॅव्होकॅडोच्या जाती आणि निवड, माती तयार करणे व लागवडीचे तंत्र, पोषण व्यवस्थापन व सिंचन पद्धती, कीड व रोग व्यवस्थापन, छाटणी, काढणी व काढणीनंतरची हाताळणी, मार्केटिंग आणि मूल्यवर्धन आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT