निरगुडसर ता. आंबेगाव : येथील मतदान केंद्रावर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्हीलचेअरच्या मदतीने येऊन मतदानाचा हक्क बजावला. esakal
पुणे

Lok Sabha Election 2024 : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळ डिजिटल टीम

Shirur: मतदान केंद्रावर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्हीलचेअरच्या मदतीने येऊन मतदानाचा हक्क बजावला. आंबेगाव तालुक्याबरोबरच शिरूर लोकसभा मतदार संघाचा गेली अनेक वर्षापासून मला अभ्यास आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विजयी होतील असा विश्वास सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

निरगुडसर ता. आंबेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर आज सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व पत्नी किरणताई वळसे पाटील, मुलगी पुर्वा वळसे पाटील यांच्यासह येऊन शिरूर लोकसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला यावेळी पत्रकारांशी बोलताना दिलीप वळसे पाटील बोलत होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले भारतीय लोकशाहीत आपल्या राज्यघटनेत जे मुलभूत अधिकार दिले आहे. त्यामध्ये मतदान करणे आणि आवडीचे सरकार निवडणे हा एक अधिकार आहे. त्यामुळे मी मतदान करण्यासाठी आलो काही कारणाने छोटीशी दुखापत झाली त्यामुळे व्हीलचेअर च्या साह्याने येऊन मतदान केले मतदान केले याचा मला आनंद आहे. मी गेली दीड महिने हॉस्पिटल मध्ये होतो हॉस्पिटल मधुन प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेऊन योग्य त्या सूचना देत होतो. वेळोवेळी आढावा घेत होतो.

गेली अनेक पंचवार्षिक पासून शिरूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी मी घेत असतो. परंतु दुर्देवाने यावेळी मला ती घेता आली नाही तरीही आमचा राष्ट्रवादी पक्ष सर्व सामान्यांपर्यंत पोहचलेला कार्यकर्त्याचे मोठी फळी असलेला पक्ष आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झटून काम केले आहे. त्यामुळे आमचे उमेदवार आढळराव पाटील निच्छित निवडुन येतील असा ठाम विश्वास व्यक्त केला.

खर तर लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे दुर्देवाने आज मोठ्या नेत्यांपासून लहान नेत्यांपर्यंत राष्ट्रीय प्रश्न बाजूला ठेऊन वैयक्तिक आरोप करणे भावनिक आवाहन करणे वगैरे हे लोकशाहीला शोभा देण्यासारखे नाही असे मला वाटते अशी खंत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT