biodiversity day 
पुणे

प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या सापामधील 2 नव्या जिवाणूंचा शोध

सम्राट कदम

उत्तर पश्चिम घाटात आढळणाऱ्या हरणटोळ जातीच्या सापातील दोन नवीन जिवाणूंचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला आहे

पुणे- उत्तर पश्चिम घाटात आढळणाऱ्या हरणटोळ जातीच्या सापातील दोन नवीन जिवाणूंचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला आहे. हे जिवाणू प्रतिजैविकांना दाद न देणारे आहेत, अशी माहिती राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेतील (एनसीसीएस) ज्येष्ठ सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी दिली.जुन्नर, पुणे आणि चंडीगड येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने हा अभ्यास केला आहे. (Discovery of 2 new bacteria in snakes that do not respond to antibiotics)

नवीन जिवाणू हे सापाच्या विष्ठे मधून शोधून काढण्यात आलेले आहे. शास्त्रज्ञांनी सावेजिया वंशातील आणि प्लॅनोकोकासिया कुटुंबातील ‘एसएन ६ टी’ आणि ‘एसएन ६ बी’ या दोन नवीन प्रजातींचा शोध घेतला आहे. त्याला ‘सावेजीया सर्पेंटीस स्पेसीस नोव्हेल’ हे नाव दिले आहे. संशोधनात जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालय, पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर मायक्रोबियल रिसोर्स, एनसीसीएस आणि चंडीगड येथील सी. एस. आय. आर. इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी यांचा सहभाग आहे. संशोधक डॉ. रवींद्र चौधरी म्हणाले, ‘‘प्राण्यांच्या विष्ठेमध्ये असलेले जिवाणू पावसाळ्यात पाण्यामार्फत किंवा हवेच्या माध्यमातून मानवासह इतर प्राण्यांच्या संपर्कात येतात. नवीन शोधून काढलेले जिवाणू प्लॅनोकोकेसी कुटुंबातील आहेत. यातील काही प्रजाती रोगकारक आहेत.’’ हे संशोधन ‘स्प्रिंजर - नेचर जर्नल अँटनी व्हॅन लीऊवेनहोक’मध्ये प्रकाशित झाले आहे.

संशोधनाचे महत्त्व

- सापांमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंवर कमी संशोधन

- प्राण्यांपासून मानवात होणारा रोगप्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण

- सापडलेले दोन्ही जिवाणू प्रतिजैवकांना दाद देत नाही

- हे जिवाणू सापांच्या आतड्यात असलेल्या सूक्ष्मजंतूंचे प्रतिनिधित्व करतात

भविष्यात वन्यजीवपासून होणारे रोग टाळण्यासाठी अशा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. प्राण्यांपासून येणारे सूक्ष्मजीव शोधणे आवश्यक आहे. हरणटोळ सापांच्या विष्ठेमधून नव्याने शोधलेले जिवाणू चार वेगवेगळ्या वर्गाच्या बहुविध प्रतिजैविकांना प्रतिरोधक आहेत, असं शास्त्रज्ञ डॉ. व्यंकट म्हणाले.

प्लॅनोकोकसच्या काही जाती आणि प्रजाती इतर प्राण्यांसाठी रोगकारक असल्याचे आढळून आले आहेत. वन्य प्राण्यांशी संबंधित सूक्ष्मजंतूंचा अभ्यास या जिवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. कारण ते प्राणांच्या आरोग्यावर परिणाम करतात, असं संशोधक डॉ. श्रीकांत पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT