पुणे - गेल्या दोन महिन्यांपासून हातगाडी बंद आहे. आधीच पैशांची (Money) चणचण आणि त्यातच बायको (Wife) आणि चार वर्षांची मुलगी (Girl) कोरोनाबाधित (Corona Affected) झाली. उपचारासाठी (Treatment) पैसे नाही. हिंमत करून त्यांना घरीच उपचार सुरू ठेवले अन् कुरिअर वाटपाचे (Courier Distribution) काम (Work) सुरू केले. बायको आणि मुलगी दोन्ही कोरोनामुक्त (Coronafree) झाल्या. करिअरच्या माध्यमातून दररोज दोनशे ते तीनशे रुपये उत्पन्नही सुरू झाले.
कसबा पेठेतील विजय सिवरिया सांगत होता. विजय शेवपाव आणि बर्गरची गाडी लावतो. त्यातून दरमहा त्याला चांगले उत्पन्न मिळत होते. त्यातून त्यांची पत्नी आणि दोन मुलींचे भागत होते. परंतु गेल्या वर्षभरापासून दरमहा मिळणारे उत्पन्न डळमळीत झाले आहे. तर गेल्या दोन महिन्यांपासून हातगाडी पूर्णपणे बंद आहे. एकीकडे आर्थिक कोंडी झाली असतानाच बायको रश्मी आणि चार वर्षांची सनश्री कोरोनाबाधित झाली. पत्नीला खूप त्रास होत होता. परंतु दवाखान्यात नेण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे घरीच मुलीला आणि बायकोला ठेवण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूचे आणि नातेवाइकांनीदेखील दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतु पैसे नसल्यामुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेव. तू बरी होऊ शकते,’ असा धीर तिला दररोज देत होतो.
आज दोघीही ठणठणीत आहेत. या काळात काम नसल्यामुळे डोअर टू डोअर कुरिअर वाटपाचे काम मिळाले. दिवसभर फिरून ते कुरिअर वाटप केल्यानंतर दोनशे ते तीनशे रुपये मिळतात. पेट्रोलचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे मिळणारे पैसे देखील कमी झाले आहे. परंतु घरी बसून काय करणार हा विचार करून काम सुरू ठेवले आहे, असे विजय सांगत होता.
अडचणीच्या काळात जाणीव, हातगाडी-पथारी-फेरीवाले संघटनेकडून पाठबळ मिळाले. त्यामुळे आज या संकटातून मी आणि माझे कुटुंब सुखरूप बाहेर पडले. त्यामुळे जिद्द हरवू नका, सगळ्या संकटाचा सामना करता येतो आणि त्यातून बाहेरही पडता येते.
- विजय सिवरिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.