District Bank has been voted NCP candidates will win Dattatraya Bharane sakal
पुणे

सर्व ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी होतील : दत्तात्रय भरणे

आशियातील अग्रगण्य बँक असा नावलौकिक संपादन केला

डॉ. संदेश शहा

इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने (Pune District Central Bank)आशियातील अग्रगण्य बँक असा नावलौकिक संपादन केला असून सकाळी अर्जदिल्यानंतर संध्याकाळ पर्यंत कर्ज देणारी देशातील ही एकमेव बँक आहे. त्यामुळे मतदान झालेल्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress) सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील असा आत्मविश्वास सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Vithoba Bharne) यांनी व्यक्त केला.

इंदापूर प्राथमिक शाळा नंबर एक येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकी निमित्त मंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे, मोहोळ चे आमदार तथा इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, जेष्ठ मतदार हनुमंत कृष्णाजी रणसिंग ( वय ८०) यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी ते बोलत होते.

श्री.भरणे पुढे म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून पाच लाख रुपयां पर्यंत शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज देणारी ही एकमेव बँक आहे. त्यामुळे या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय निश्चित आहे. इंदापुरात आता रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. मात्र कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे ठेकेदार रस्त्याचे काम करत आहेत. त्यांच्याकडे पाच वर्षे रस्ता देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे जे ठेकेदार नियमाप्रमाणे काम करणार नाहीत ,त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल असे सूतोवाच श्री. भरणे यांनी केले.

लाकडी निंबोडी येथे अनेकांनी गुढ्या उभारल्या, त्यावर निवडणुका जिंकल्या पण तेथील पाणीप्रश्न सुटला नाही. मात्र हा प्रश्न आपण कायमस्वरूपी सोडविणार असून मार्च महिन्यात राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याप्रमुख उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेवून हा प्रश्न सोडविला जाईल. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही येत नाही मात्र काम करणे हे माझ्या रक्तात आहे. त्यामुळे विरोधकांवर टीका करून नव्हे तर प्रत्यक्ष कायमस्वरूपी काम करून विकास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.

दरम्यान इंदापूर मतदान केंद्रावर एकूण ३६२ मतदान आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अ वर्ग १६७, ब वर्ग १४, क वर्ग ३९ तर ड वर्ग १०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पोलीस निरीक्षक तैयब मुजावर यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

Deolali Assembly Constituency : देवळालीच्या वाढीव टक्क्याचा लाभार्थीचा फैसला शनिवारी

SCROLL FOR NEXT