पुणे : ''पुण्यात काल आणि आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रत्येकी 400 पेक्षा जास्त असली तरी, ही संख्या एका दिवसांतील नाही तर, मागील चार दिवसांतील आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही,''अशी ग्वाही विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी वेब पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुण्यात 459 हा कालचा (25 मे) पॉझिटिव्हचा आकडा हा गेल्या चार दिवसांचा होता. प्रशासनाने नागरिकांचे 1493 सॅंपल घेतले होते. त्यातील 69 पॉझिटिव्ह कालचे होते तर उर्वरित हे या पूर्वीच्या तीन ते चार दिवसांतील आहेत. सॅंपल घेतल्यावर अहवाल येण्यासाठी एनआयव्हीकडून 36 तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. 26 मे म्हणजे आज 404 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 1500 सॅंपल घेतले होते, त्यातून हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातही दोन किंवा तीन दिवसांचे रिपोर्ट आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुण्यात गुंडाराज ; वर्चस्ववादातून लाॅकडाउनमधील तिसरा खून
पुणे शहर, जिल्ह्यात 6303 केसेस पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 5385 शहरातील तर 387 पिंपरी चिंचवडमधील तर, जिल्ह्यातील 189 केसेस पॉझिटिव्ह आहेत. उर्वरित या कॅंटोन्मेंटमधील आहेत. एकूण 3195 रुग्णांना डिस्चार्ज केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुणेकरांनो,पुढचे २ दिवस घरातच राहा कारण..
पुण्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अहवालांचे विश्लेषण करताना असे लक्षात आले की, 51 ते 60 वर्षे वयोगटातील 51 टक्के, 61-70 या वयोगटातील 33 टक्के, 70 वरिल वयोगटातील 11 टक्के रुग्णांचे मृत्यूंचे प्रमाण आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आदेश सर्व महापालिकांना देण्यात आले आहेत.
आम्हाला धान्य कधी मिळणार? लॉकडाऊन संपल्यावर... : संतप्त नागरिकांचा सवाल
पुणे विभागातून 141 रेल्वेगाड्यांतून 1 लाख 78 हजार श्रमिक प्रवासी गेले आहेत. पुण्यातून 85 रेल्वे गाड्यांतून 1 लाख 12 हजार प्रवासी जात आहेत. तर, 6 हजार 793 बसमधून 1 लाख 3 हजार 672 प्रवासी आजवर गेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
लोहगाव विमानतळावर 25 मे रोजी 823 प्रवासी आले, 26 मे रोजी दुपारपर्यंत 344 प्रवासी आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पिंपरी चिंचवडमध्ये 30 रूटवर बस सुरू केल्या आहेत. 80 सकाळी आणि 80 दुपारच्या सत्रात सुरू आहेत. सध्या निम्या बस आहेत. हिंजवडी, चाकण, भोसरी आदी औद्योगिक, आयटी क्षेत्रासाठी धावत आहेत. भोसरी, पिंपरी आणि निगडी या आगारांतून धावत आहेत, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.