Pune Rain News sakal
पुणे

Pune Rain News : धरण परिसरात पावसाचा जोर कायम;भिडे पूल परत पाण्याखाली,विसर्ग पुन्हा सुरू,आणखी वाढण्याची शक्यता

पानशेत धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे पानशेत धरणातून खडकवासला धरणात सोमवारी पहाटेपासून १५ हजार १३६ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पानशेत धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे पानशेत धरणातून खडकवासला धरणात सोमवारी पहाटेपासून १५ हजार १३६ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

यापूर्वीच खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून सोमवारी दुपारी २५ हजार क्युसेकने नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे.

खडकवासला साखळी प्रकल्पात एकूण पाणीसाठा ८६ टक्के म्हणजे २५.०३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. मागील २४ तासांत खडकवासला धरणात ९ मिमी, पानशेत धरणात ५० मिमी, वरसगाव मध्ये ५२ मिमी आणि टेमघर धरणात १२० मिमी इतका पाऊस पडला आहे. पानशेत ९२ टक्के भरले आहे. तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक धरणात होत आहे.

त्यामुळे पानशेत धरणातून सोमवारी मध्यरात्री ९ हजार ८२४ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर विसर्ग वाढविण्यात आला. पहाटे चार वाजता पानशेत धरणातून १५ हजार १३६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

हे पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. हा विसर्ग आणि ओढ्या-नाल्याद्वारे जमा होणारे पाणी यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार आहे. त्यानुसार १८ हजार ४९१ क्युसेकने पहाटे चार वाजता खडकवासला धरणातून पाणी नदीत सोडण्यात येत होते. त्यामध्ये वाढ करून सकाळी नऊ वाजता २२ हजार ८८० क्युसेक त्यानंतर दुपारी १२ वाजता २५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT