Pune Fire Sakal
पुणे

Pune Fire : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे शहरात आगीच्या १६ घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा करीत असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत फटाक्यांमुळे आगीच्या १६ घटना घडल्या. या घटनांमध्ये बरेच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली.

रविवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे या आगीच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात रात्री साडेसात वाजल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत आगीच्या १६ घटनांची नोंद झाली. शुक्रवार पेठेत पोलिस चौकीसमोर नऊ वाजण्याच्या सुमारास जुन्या वाड्याला आग लागली. या वाड्यात कोणी राहत नव्हते.

अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन बंब आणि दोन पाण्याच्या टँकरद्वारे ही आग आटोक्यात आणली. तर, वाघोली-बायफ रस्त्यावरील ब्ल्यू स्काय सोसायटीच्या दहामजली इमारतीमधील एका सदनिकेत आग लागली. पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

या घटनांमध्ये कोठेही जखमी किंवा जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. गतवर्षी शहरात दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे १७ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. तर नऱ्हे भागात एक मुलगा जखमी झाला होता.

आगीच्या घटनांची वेळ, स्थळ

७.३८ वा. - रास्ता पेठ, केईएम रुग्णालयाजवळ एका इमारतीच्या छतावर आग

७.४० वा. - कोथरूड, सुतार दवाखान्याजवळ दुकानात आग

८.१८ वा. वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग

८.२४ वा. - कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचऱ्याला आग

८.५० वा. - नाना पेठ, चाचा हलवाईजवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरात आग

८.५२ वा. - घोरपडे पेठ, मारुती मंदिराजवळ झाडाला आग

८.५७ वा. - कोंढवा, शिवनेरीनगर येथे इमारतीत छतावर आग

८.५८ वा. - वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग

९ वा. - शुक्रवार पेठेत पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग

९ वा. - वाघोली-बायफ रस्ता,: ब्ल्यू स्काय सोसायटीतील सदनिकेत आग

९.१३ वा. - केशवनगर मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीतील सदनिकेत आग

९.२७ वा. - आंबेगाव पठार येथे भंगार दुकानात आग

९.३१ वा. - शुक्रवार पेठेत पोलिस चौकीसमोरील तिसऱ्या मजल्यावर आग

९.३२ वा. - गुरुवार पेठेतील कृष्णाहट्टी चौकातील दुकानात आग

९.५० वा. - हडपसर, रासकर चौकात एका घरामध्ये आग

९.५१ वा. - पिसोळी, खडी मशिन चौकाजवळ अदविका सोसायटीत घराच्या गॅलरीत आग

काय खबरदारी घ्याल?

- फटाके फोडताना बोटाला, डोळ्याला किंवा हाताला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे फटाके फोडताना खबरदारी घ्यावी

- डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक चष्मा घाला. इजा झाल्यास तातडीने डॉक्टरकडे जा

- सोसायटीमध्ये फटाके फोडल्यानंतर दुसऱ्याच्या घरात ठिणगी पडणार नाही, याबाबत सावधगिरी बाळगा

- मोकळ्या जागेत फटाके फोडा

- मुलांनी पालकांच्या देखरेखीखाली फटाके फोडावेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला पोहोचले

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT