पुणे : कोरोना संसर्गाचा दर १४ टक्के असला तरीही त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दोन टक्क्यांपर्यंत रोखण्यात पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. त्यामुळे ही स्थिती लॉकडाउन करण्यासारखी नाही. संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी गर्दी टाळा आणि प्रतिबंधक लस घ्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरात गेल्या ३५६ दिवसांमध्ये दोन लाखांहून (५ टक्के) अधिक जणांना कोरोना झाला. त्यापैकी जवळपास चार हजार ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला. ही सद्यःस्थिती असली तरीही परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर गेली नाही, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.
शहरात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोरोनाचा मृत्यूदर ११.४ टक्क्यांपर्यंत वाढला होता. त्यावेळी शहरातील सरकारी रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांनी भरली होती. रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यासाठी खाट मिळत नव्हती. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ही सर्व परिस्थिती गेल्या वर्षभरात सुधारली आहे. गर्दीची ठिकाणे टाळणे, सण-समारंभ, लग्नकार्य यातील गर्दी कमी करणे आणि कोरोना प्रतिबंधक लस या तीनही गोष्टींचा प्रभावी वापर केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
डॉक्टरांचा अनुभव वाढला
कोरोनाच्या रुग्णांवर उपचाराचा मोठा अनुभव शहरातील डॉक्टरांकडे आहे. त्यामुळे रुग्णाच्या आजाराच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर कोणते उपचार कसे करायचे, त्यातून रुग्णाचा कसा प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे, याची शास्त्रीय माहिती आता संकलित झाली आहे. त्यातून कोरोनाचा मृत्यूदर नियंत्रित ठेवणे शक्य झाले आहे.
ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा
पुण्यात २४८ रुग्णालयांमधून सुमारे दररोज ७२ मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला जातो. ही सर्व मागणी पूर्ण करण्यात येत आहे. ऑक्सिजनची मागणी आणि त्याचा पुरवठा यावर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काटेकोर काळजी घेण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आली.
व्हिडिओ गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शहरातील सद्यःस्थिती
२६० अत्यवस्थ रुग्ण
५०९ ऑक्सिजनची गरज असलेले
पालिका रुग्णालयांतील राखीव बेड
१०० दळवी रुग्णालय
१५० नायडू रुग्णालय
५० लायगुडे रुग्णालय
५० बोपोडी रुग्णालय
३२५ बाणेर रुग्णालय
केंद्रीय आरोग्य खात्याचे निरीक्षण
-पुण्यात आठ दिवसांपासून रुग्णसंख्या वाढतेय
-देशातील ४४.९ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात
-त्या खालोखाल केरळमध्ये ३१.३ टक्के ॲक्टिव्ह रुग्ण
-देशात सर्वाधिक उद्रेक पुणे जिल्ह्यात
-सर्वाधिक रुग्णांची संख्या पुणे शहरात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.