पुणे

बनावट कॉल्सवर विश्वास ठेवू नका

CD

पुणे ता. १५ : ग्राहकांना गॅसची बिले मोबाइल ॲपद्वारे भरण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी कोणतीही सुविधा प्रदान केलेली नाही. त्यामुळे अशा बनावट किंवा फसव्या कॉल्सवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन एमएनजीएलच्या बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी पुन्हा केले आहे.
एमएनजीएलकडे बनावट कॉल्स आणि मेसेजसंदर्भात पुन्हा तक्रारी दाखल झाल्या आहेत. ग्राहकांना फोन करून अथवा मेसेजद्वारे ‘मोबाईल लिंक डाउनलोड करून पैसे भरा. अन्यथा तुमचे गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल किंवा तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट न केल्यामुळे आज रात्री एमएनजीएल गॅस कनेक्शन खंडित केले जाईल’ असे सांगितले जात आहे. त्यामुळे एमएनजीएल व्यवस्थापनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. तसेच ग्राहकांनाही सूचित केले आहे. यासंदर्भात एमएनजीएलने पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रारही केली आहे.
यासंदर्भात जैन म्हणाले, ‘‘एमएनजीएलच्या सर्व ग्राहकांनी तोतयागिरी करून एमएनजीएलच्या नावाने फसवे कॉल्स करणाऱ्या आणि गॅस बिल भरण्यासाठी काही ॲप्स डाउनलोड करण्यास किंवा लिंकद्वारे विचारणा करणाऱ्या फसव्या कॉल्सपासून सावध राहावे. एमएनजीएल फक्त बिलावर नमूद केलेल्या पेमेंट मोडद्वारे पेमेंट स्वीकारते. https://www.mngl.in/pay-bill भारत बिल पेमेंट सिस्टम एनएसीएच, ईसीएस, ॲक्सिस, आयसीआयसीआय बँकेच्या शाखांमध्ये धनादेश आणि पुण्यातील शिवाजीनगर आणि चिंचवडमधील एमएनजीएल वॉक-इन सेंटर्समध्ये बिलाची रक्कम स्वीकारली जाते. त्यामुळे अशा तोतयागिरीपासून ग्राहकांनी सावध राहावे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT