Dr Amit Thadani statement Investigate for politics not for justice Dabholkar Pansare Lankesh Kalburgi murder cases  sakal
पुणे

Pune : न्यायासाठी नव्हे तर राजकारणासाठी तपास; डॉ. अमित थडानी

दाभोलकर, पानसरे, लंकेश आणि कलबुर्गी हत्याकांडाबद्दल डॉ. अमित थडानीचे मत; पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूर्वग्रहानुसार आधीच निश्चित केलेले खुनी, त्या दृष्टीने जुळवलेले पुरावे, आधीच बेपत्ता असलेले संशयित आणि प्रत्येक आरोपपत्रात नवे आरोपी! यामुळे दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्याकांडाचा तपास न्यायासाठी नव्हे तर राजकारणासाठी चालला आहे, असे स्पष्ट मत द रॅशनॅलिस्ट मर्डर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी यांनी व्यक्त केले.

पुरोगामी विचारवंत, लेखक आणि कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या तपासातील कच्चे दुवे आणि चुकीच्या तपास पद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे लेखन डॉ. थडाने यांनी केले आहे. त्याचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका शेफाली वैद्य आणि विद्याधर नागोर यांच्या हस्ते पार पडले. डॉ.थडाने म्हणाले,"अनेक वर्षानंतरही पोलिसांना आरोपी निश्चित करता आले नाही.

प्रत्येक आरोप पत्रातील आरोपी बदलत असून, त्यांचे रेखाटनही संशयास्पद आहे. अनेकांना मारून मुटकून जबाब नोंदवल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले आहे. प्रत्येकवेळी कथानकही बदलत असून, पोलिसांनी स्वतःचे कथानक सिद्ध करण्याऐवजी तथ्यांच्या आधारे तपास करणे गरजेचे आहे." गौरी लंकेश यांच्या प्रकरणात तर प्रत्यक्षदर्शींचे आरोपींचे केलेले रेखाटनही जुळत नसून, प्रत्येक आरोप पत्रावेळी नवे आरोपी दाखवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

चारही विचारवंतांच्या हत्येतील युक्तिवाद आणि सरकारी कागदपत्रे वाचले, तर संपूर्ण तपास प्रक्रियेतच गोंधळ असल्याचे मत वैद्य यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,"पोलिसांनी आधीच दोषींना निश्चित करून माध्यम ट्रायल घेतली आहे. याच कालखंडात झालेल्या इतर विचारवंतांच्या तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले."

डॉ.थडाने म्हणाले...

- पोलीस प्रत्येक वेळी नवे आरोपी उभे करतात

- नव्या आरोप पत्रात आरोपींचे रेखाटनही बदलते

- रात्रीच्या अंधारात हेल्मेट घालणाऱ्या संशयिताचे रेखाटन तयार करणे अजब गोष्ट

- संपूर्ण तपासा आधीच आरोपपत्र दाखल कसे होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

...तर ॲडमिनवरही दाखल होईल गुन्हा! सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ९९ जणांवर कारवाई; सायबर पोलिसांनी हटविल्या ३० पोस्ट; १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT