dr. pradeep kurulkar esakal
पुणे

ATS Sadanand Date : कुरुलकरच्या ‘व्हॉइस लेअर’ चाचणीबाबत निर्णय लवकरच

‘डीआरडीओ’चे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याची ‘आवाज स्तर’ (व्हॉइस लेअर) चाचणी करण्याची मागणी ‘एटीएस’ने विशेष न्यायालयाकडे केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘डीआरडीओ’चे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याची ‘आवाज स्तर’ (व्हॉइस लेअर) चाचणी करण्याची मागणी ‘एटीएस’ने विशेष न्यायालयाकडे केली आहे. आरोपी कुरुलकर याने या चाचणीस नकार दिला आहे.

परंतु या चाचणीसाठी आरोपीच्या परवानगीची गरज नाही. याबाबत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी सांगितले.

डॉ. कुरुलकर याच्याविरुद्ध ‘एटीएस’ने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र विशेष न्यायालयात शुक्रवारी दाखल केले. त्यात कुरुलकर याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरवली. झारा दासगुप्ता नावाच्या महिलेने कुरुलकर याला मोहजालात (हनी ट्रॅप) अडकवून लष्करातील गोपनीय माहिती घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कुरुलकर याने झारा दासगुप्ताचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. त्यानंतर झारा दासगुप्ता नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील महिलेने बंगळूरमधील वायुदलातील कनिष्ठ कर्मचारी निखिल शेंडे याच्या माध्यमातून कुरुलकरशी संपर्क साधला होता.

याबाबत शेंडे याचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून, त्याला साक्षीदार केले आहे. कुरुलकर याच्याविरुद्ध एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. परंतु संबंधित महिलेने तक्रार दिलेली नाही. या अनुषंगानेही ‘एटीएस’कडून तपास करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT