Dr Vipin Kumar statement Initiative for eco-friendly Ganesh idols National Innovation Foundation pune  sakal
पुणे

नवीन कल्पनांचा आता नागरिक गांभिर्याने विचार करीत आहेत - डॉ. विपिन कुमार

डॉ. विपिन कुमार, ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’कडून इको फ्रेंडली गणेश मुर्तींसाठी पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे सध्या अनेकांचे प्रयत्न आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यावर भर दिला गेला पाहिजे. एक चांगली कल्पना पूर्ण गावाला रोजगार उपलब्ध करून देऊ शकते. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आता नागरिक नवीन कल्पनांचा गांभिर्याने विचात करीत आहेत,’’ असे मत नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे (एनआयएफ) संचालक आणि मुख्य नवकल्पना अधिकारी डॉ. विपिन कुमार यांनी गुरुवारी (ता.९) व्यक्त केले.

पर्यावरणपुरक वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी ‘एनआयएफ’ आणि ‘ट्रायकोलर इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानिमित्ताने ‘इको फ्रेंडली गणपती’ मुर्तीबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात डॉ. कुमार बोलत होते. ट्रायकोलरचे फायनान्स संचालक रजनीश प्रभू, मधू नायर, डॉ. राजशेखर अय्यर आणि ‘एसआयआयएलसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निनाद पानसे यावेळी उपस्थित होते.

डॉ. कुमार म्हणाले, ‘‘शेतीवर अवलंबून असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नावीन्यपुर्वक बाबी करणे गरजचे आहेत. शेतीचे क्षेत्र वाढणार नाही पण आहे त्या क्षेत्रातील उत्पन्न वाढले पाहिजे. त्यातून शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल. त्यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत करत आहोत. या कामात ‘सकाळ’ने नेहमीच मदत केली आहे.’’ ट्रायकोलर इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून इको फ्रेंडली गणेश मुर्तीबाबत माहिती दिली. या मुर्ती गार्इच्या शेणापासून तयार करण्यात आल्या आहेत. पीओपीच्या गणेशमूर्तींमुळे पर्यावरणाचे काय नुकसान होते तसेच इको फ्रेंडली गणेश मुर्ती का आवश्यक आहेत याबाबत यावेळी पीपीटी सादरीकरण केले. नायर यांनी देखील आपले विचार यावेळी व्यक्त केले. तर डॉ. अय्यर यांनी शेणाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानसे यांनी केले. ‘सकाळ’ राबवीत असलेल्या उपक्रमांत सहभागी झालेल्यांना नावीन्यपूर्ण बाबी शिकवता याव्यात यासाठी ‘एनआयएफ’चे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत, असे पानसे म्हणाले. शिक्षण आणि इनोव्हेशनबाबत ‘सकाळ’ करीत असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. आभार प्रभू यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT