DRDO scientist arrested for providing confidential information to Pakistan through honeytrap Action of Pune Anti-Terrorism Squad Sakal
पुणे

Pune : तिच्या मोहात फसला, हनीट्रॅपमध्ये अडकला, पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याने DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक

पुणे दहशवाद विरोधी पथकाची कारवाई  

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाची संवेदनशील शासकीय माहिती पाकीस्तानला पुरविल्याप्रकरणी पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) डीफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑरगानायझेशन (डीआरडीओ) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाला अटक केली आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञाला न्यायालयाने नऊ तरखेपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

डीआरडीओतील संशयित शास्त्रज्ञ पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेच्या हस्तकांशी संपर्कात होते. त्यासाठी ते समाजमाध्यमातील संपर्क सुविधाचा वापर करत असल्याची माहिती एटीएसच्या पुणे पथकाला मिळाली होती. त्यानंतर एटीएसच्या पथकाने तांत्रिक तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, तीन मे रोजी पुणे येथील डीआरडीओच्या शास्त्रज्ञ कार्यालयामध्ये कार्यरत असताना त्यांनी पाकीस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह हस्तकाशी सामाजिक माहिती व्हॉटसअ‍ॅप व्हाईस मेसेज, व्हिडीओ कॉलने संपर्कात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय गुपीत माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा ठपका ठेवत संशयास्पद हालचालीवरून ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी एटीएसकडून मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय गुपीते अधिनियम १९२३ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय माहिती पुरविली याची चौकशी सुरू

अटक शास्त्रज्ञाची सध्या सखोल चौकशी करण्यात येत आहे. ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात कसे आले. त्यांनी नेमकी काय माहिती पुरविली, यादृष्टीने तपास सुरु आहे. नोव्हेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. देशात या पूर्वी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने तरुणींशी मैत्रीच्या मोहजालात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी अडकवल्याचा घटना घडल्या होत्या. त्यानंतर लष्कराने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह जवानांना सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT