Kasba Ganpati in Pune sakal
पुणे

Pune News : जिल्ह्यातील ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे भाविकांनी असभ्य, तोकडे आणि अशोभनीय कपडे घालून मंदिरात प्रवेश टाळावा, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील सुमारे ५२८ मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू झालेली आहे.

नवी पेठेतील पत्रकार संघात आयोजित परिषदेला हिंदू जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक पराग गोखले, महासंघाचे जिल्हा निमंत्रक चोरघे महाराज, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या विश्वस्त संगिता ठकार, कऱ्हे पठार खंडोबा मंदिर देवस्थानचे विश्वस्त ॲड. मंगेश जेजुरीकर, चतुःश्रृंगी देवस्थानचे नंदकुमार अनगळ, हडपसर येथील तुकाई देवस्थानचे सचिव सागर तुपे आदी उपस्थित होते.

शाळा, न्यायालये आणि डॉक्टरांसाठीही वस्त्रसंहिता आहे. त्यात धरतीवर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली असून, थेट बंदी न घालता भाविकांची जागृती करण्यात येईल, असेही उपस्थितांनी सांगितले.

ग्रामदैवत कसबा गणपती, चतुःश्रुंगी, जेजुरीचे खंडोबा मंदिर, भुलेश्वर महादेव, क्षेत्र कानिफनाथ गड, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, बनेश्वर महादेव नरसापूर आदी ७१ मंदिरात ही संहिता लागू असले. भाविकांच्या वतीने संहितेचे स्वागतच करण्यात आले असून, अनवधानाने कोणी तोकड्या कपड्यांत आल्यास वस्त्र देण्याची सुविधाही उपलब्ध करू, असेही उपस्थितांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT