dri action at pune airport gold smuggling from dubai 3 cr gold seize Sakal
पुणे

Pune Crime News : दुबईहून सोन्याची तस्करी; साडेतीन कोटींचे सोने जप्त, DRI ची कारवाई

दुबईवरून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले. सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुबईवरून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले. सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सला (डीआरआय) मिळाली होती. त्यानुसार पथकाने विमानतळावर सापळा लावला होता.

विमानतळावर आल्यानंतर महिला पोलिसांना गडबडीत दिसली. तर कारवार्इ होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्याबरोबर असलेला साथीदार विमानतळातून बाहेर पडण्याचा प्रयत्नात होते. डीआरआयच्या पथकाने दोघांची संशयावरून चौकशी सुरू केली.

दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोने आढळून आले. त्यानुसार महिलेसह तिच्याबरोबर असलेल्या अटक करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय सीमाशुल्क कायद्यान्वये (कस्टम ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांची न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. चार दिवसांपूर्वी कस्टमच्या पथकाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ७३ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.

पावडर करून सोने लपवले पट्टा आणि पाकिटात

आरोपींनी सहा किलो ९१२ ग्रॅम वजन असलेल्या सोन्याची पावडर केली होती. ती पावडर त्यांनी पट्टा आणि पाकिटात लपवून ठेवली होती. तपासणीत ही बाब पथकाच्या लक्षात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT