ringroad pune 
पुणे

रिंगरोडचे ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याला स्टिअरिंग कमिटीने मान्यता दिल्यामुळे त्या रस्त्याच्या ‘सर्वंकष प्रकल्प अहवाला’चे (डीपीआर) काम हाती घेण्यात आले आहे. 

या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मार्गाच्या सर्वेक्षणाचे यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच, त्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली असून, त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यापाठोपाठ पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. त्यासाठी तीन पर्यायी मार्गांचा विचार करण्यात आला होता. 

मध्यंतरी स्टिअरिंग कमिटीच्या बैठकीत, त्यापैकी एका मार्गास मान्यता देण्यात आली. आता त्या मार्गाचे ‘सर्वंकष प्रकल्प अहवाल’ तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

खेड, हवेली, पुरंदर आणि भोर अशा चार तालुक्‍यांतून जाणारा हा रस्ता सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असून, पुरंदर येथील नियोजित विमानतळाजवळून तो नेण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून, पुणे- सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथे येऊन मिळणार आहे. पुरंदर येथील प्रस्तावित असलेल्या पुरंदर विमानतळावर जाण्यासाठीचा मार्गदेखील त्यामुळे उपलब्ध होणार आहे. पीएमआरडीएने हाती घेतलेल्या रिंगरोडला समांतर असलेला भाग वगळून एमएसआरडीसीने नव्याने सर्वेक्षण करून या रिंगरोडची आखणी करण्यात आली असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.

प्रकल्पासाठी गरज २३०० हेक्‍टरची 
एमएसआरडीसीच्या रिंगरोडची एकूण लांबी सुमारे १४२ किलोमीटर आहे. खेड, शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्‍यांतून रिंगरोड जाणार आहे. यासाठी २३०० हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून प्रकल्पासाठी सुमारे १४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

असा असेल दुसरा टप्पा 
एमएसआरडीसीकडून पहिल्या टप्प्यात ६६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पूर्व भागातील रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड हा मरकळ, सोळू, लोणीकंद, भिवरी, कोरेगाव मूळ, सानोरी, दिवे, चांमळी, हिवरे, वरवे बुद्रुक असा असणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! श्रेयस अय्यवर तब्बल २६ कोटी ७५ लाखांची बोली

Amalner Assembly Election 2024 Result : अमळनेरला मंत्री अनिल पाटलांची बाजी; 33 हजार 445 मतांचे मताधिक्य

तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी; भाजप-धजद युतीला धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचे दोन पुत्र पराभूत

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, पण.... अब्दुल सत्तार यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT