drug party at a reputed hotel on FC Road
drug party at a reputed hotel on FC Road esakal
पुणे

Pune Drug Case: पुण्याचा उडता पंजाब! पोर्शे कार प्रकरणानंतर एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी

Sandip Kapde

पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एफसी रोडवरील एका हॉटेलमधील हा व्हिडिओ आहे. या हॉटेलमध्ये काही तरुण लेटनाईट पार्टीनंतर बाथरुममध्ये ड्रग्ज सेवन करत असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडिओनंतर पुण्यातील हॉटेलबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. हा व्हिडिओ नेमका कुठल्या हॉटेलमधील आहे. ड्रग्जचं सेवन करणारे तरुण कोण आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.

पुण्याचा आता उडता पंजाब होतोय का असा प्रश्न विचारल्या जात आहे. आधी अल्पवयीन मुलांना सहज पबमध्ये प्रवेश, विद्यापीठात गांजा विक्री आता हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवन, असे प्रकार समोर येत आहेत. यापूर्वी पुण्यातील कल्याणी नगर परिसारात एका अल्पवयीन मुलाने दोन जणांना उडवलं होतं. दोघांचा यात मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक कारवाई करण्यात आल्या मात्र तरी देखील ड्रग्ज पार्टी होत आहेत. (Pune Crime News)

साम टीव्हीच्या वृत्तानुसार एफसी रोडवरील हॉटेलमध्ये सकाळी ३ पर्यंत पार्टी सुरु होती. त्यानंतर बाथरुमध्ये ड्रग्ज सेवन करण्यात आले.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, पुण्यातील ड्रग्ज प्रकरण अजून संपले आहे. यावर शंभुराज देसाई आणि त्यांचे लाडके पोलीस अधीकाऱ्यांना प्रश्न विचारायला हवा.

रवींद्र धंगेकर म्हणाले, मी नेहमी सांगतो पुण्यात ड्रग्जच्या थैमानाला पोलीस जबाबदार आहेत. कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका. अशा प्रकरणाला पोलीस जबाबदार आहे. पोलिसांना पैसे दिल्याशिवाय असे धंदे होत नाही. पोलिसांना हॉटेल सील करावे. 

ड्रग्ज प्रकरणाला शंभूराज देसाई जबाबदार असल्याचा आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला . ड्रग्जचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार असून रस्त्यावर देखील आंदोलन करण्याचा इशारा रविंद्र धंगेकर यांनी दिला आहे.

साम टिव्ही दणक्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ड्रग्ज प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहे. सकाळी पहाटेपर्यंत  एफसी रोडवरील हॉटेलमध्ये पार्टी कशी सुरु होती? असा प्रश्न निर्माण झाला होता.


शंभूराज देसाई म्हणाले, मी चौकशीचे आदेश दिले आहे. या प्रकरणात सरप्राइज तपासणी का केली नाही. केली असेल तर ही पार्टी लक्षात आली नाही का? हे सर्व प्रश्नाचे उत्तरे शोधण्याचे मी आदेश दिले आहेत. पोलीस आणि राज्य उत्पादक मिळून ड्रग्ज संपवण्यासाठी काम करणार आहे. चेक पोस्ट देखील वाढवत असून फिरते चेक पोस्ट देखील असतील. 

पोलीस काय म्हणाले?

पार्टी झालेल्या हॉटेसचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासणार आहेत. सोशल मीडियात ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीस हॉटेलवर पोहचले असून चौकशी सुरु आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra News Updates : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT