पुणे - मद्यधुंद अवस्थेत भरधाव मोटारचालकांमुळे शहरात रात्री अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलिसांनी मागील नऊ महिन्यांत अशा २९३ चालकांवर कारवाई केली. मद्यधुंद चालकामुळे एका निष्पाप व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची घटना नारायण पेठेत नुकतीच घडली. त्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत मद्यपी वाहनचालकांवर दंडासह परवाना निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अशा चालकांवर काही प्रमाणात का होईना ब्रेक लागणार आहे.
नववर्ष स्वागत, होळीच्या दिवशी मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. परंतु, त्यानंतर कठोर कारवाई होताना दिसत नाही. रात्री हॉटेल, बिअर बारमधून मद्यसेवन करून बाहेर पडल्यानंतर अनेक वाहनचालक सुसाट वाहन चालवतात. मद्यपी वाहनचालकांमुळे रस्ते, पेठांमधील गल्लीबोळांमध्येही अपघात होत आहेत. अशा चालकांना आवर घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
कारवाईकडे दुर्लक्ष
शहर वाहतूक शाखेच्या काही विभागाकडून मद्यपी वाहनचालकांवर गांभीर्याने कारवाई करण्यात येत आहे. परंतु काही वाहतूक विभागांनी मागील नऊ महिन्यांत केवळ एक-दोन मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. नुकत्याच अपघात झालेल्या नारायण पेठ भागातील विश्रामबाग वाहतूक पोलिसांनी केवळ दोन मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
मद्यसेवनामुळे झालेले अपघात (१ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२३)
२ - मृत्युमुखी
१२ - गंभीर जखमी
३ - किरकोळ जखमी
१७ - एकूण
शहरातील अपघात (१ जानेवारी ते ८ ऑक्टोबर २०२३)
९०१ - एकूण अपघात
२६९ - मृत्युमुखी
५१९ - गंभीर जखमी
११११ - किरकोळ जखमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.