पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (DSK) यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबर्इ उच्च न्यायालयाने (Bombay high court) जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाचे (high court) न्यायाधीश पी. डी. नार्इक यांनी हा निकाल दिला.
पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. ३२ हजारहून अधिक ठेवीदारांची हजारो कोटींची फसवणूक केल्याप्रकरणात डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद कुलकर्णी, पुतणी, जावई यांच्यासह इतर अनेकांना २०१९ साली अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर एमपीआयडी, फसवणूकसह विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. डीएसके आणि हेमंती कुलकर्णी यांना फेब्रुवारी २०१८ साली या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून दोघेही सुरुवातील पोलिस व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत आहेत.
कुलकर्णी दांपत्यावर ३६ हजार ८७५ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर डीएसके दांपत्यांचा जामीन नाकारण्यात आला होता. शिरीष कुलकर्णी यांनी त्याचे वकील आशिष पाटणकर आणि ॲड. प्रतीक राजोपाध्ये यांच्या मार्फत जामिनाचा अर्ज दाखल केला आहे.
जामीन मिळण्यासाठी हेंमती कुलकर्णी यांनी आशुतोष श्रीवास्तव यांच्यावतीने अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने हेमंती यांचा जामीन नोव्हेंबर २०१९ साली फेटाळला होता. हेंमती या गेल्या साडेतीनवर्षांपासून तुरुंगात आहे. त्यांना शिक्षा झाल्यास त्यास असलेल्या तरतुदीनुसार त्यांनी अर्धी शिक्षा भोगली आहे. त्यांचे वय आणि कोरोना स्थितीचा विचार करता हेंमती यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. श्रीवास्तव यांनी केला. सहा आॅगस्टला याबाबत अंतिम युक्तिवाद झाला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.