वाघोली (पुणे) : निसर्ग चक्री वादळामुळे हडपसर ग्रामीण महावितरण उपविभागात 10 उच्च दाब पोल, 28 लघु दाब पोल पडले असून 6 उच्च दाब पोल व 14 लघु दाब पोल वाकले आहेत. झाडाच्या फांद्या, फ्लेक्सचे कापड पडून अनेक तारा तुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हडपसर ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अमित भरते यांनी केले आहे.
चक्री वादळाचा फटका पुणे जिल्ह्यालाही बसला. बुधवारी दुपारी जोरदार वारे वाहत होते. यामुळे अनेक पोल पडले तर अनेक वाकले. वीज वाहक ताराही मोठ्या प्रमाणावर पडल्या. जीवितहानी होऊ नये व कमी नुकसान व्हावे यासाठी सकाळ पासूनच वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. वादळानंतर पोल पडल्याने व तारा तुटल्याने खंडित झालेला विजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवसभर झटत होते.
रात्री 12 नंतर हळू हळू वीजपुरवठा सुरळीत झाला. हडपसर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या सर्व उपकेंद्रे व स्विचिंग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या सर्व उच्च दाब वाहिन्या सुरू झाल्या आहेत. परंतु पुढील वीजपुरवठा सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तपासणी करूनच सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. रात्रभर वारा व पाऊस असल्याने काही उच्च दाब वाहिन्यांचे भाग सुरू करता आले नाही. सकाळपासून वीज वाहिन्यांचे पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. सर्व जनमित्राकडून अहवाल घेवून टप्पाटप्पाने वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. असे भरते यांनी सांगितले. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
फ्लेक्समुळे मोठे नुकसान
जोरदार वाऱ्यामुळे फ्लेक्सचे कापड फाटून ते वीज वाहक तारांवर पडतात. यामुळे तारा तुटतात. दर पावसाळ्यात हा प्रकार घडतो. यामुळे महावितरणचे मोठे नुकसान होते. हे फ्लेक्स अनाधिकृत असून ते हटविण्याची मागणी महावितरणने त्या विभागाकडे यापूर्वीही केली होती. बुधवारच्या चक्री वादळानंतर असाच प्रकार घडला. यामुळे महावितरणने पुन्हा ई-मेल द्वारे या फ्लेक्सबाबत कारवाई करण्याची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.