Crime esakal
पुणे

Pune Crime : गडचिरोलीतून गांजा विक्रीसाठी आलेल्या सुशिक्षित तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गडचिरोली जिल्ह्यातून गांजा विक्री करण्यासाठी पुण्यात आलेल्या एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. हा तरुण बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या ताब्यातून सुमारे सव्वासात लाख रुपये किमतीचा ३६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन सुशिक्षित तरुणांना रविवारी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

पंकज सलियार मडावी (वय २३, रा. शिवगोरक्ष व्हिला, आंबेगाव बुद्रूक, पुणे. मूळ गाव- मसेली, ता. कोर्ची, जि. गडचिरोली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरुण मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यावरून शोध घेताना आंबेगाव बुद्रूक परिसरात एक तरुणाकडे ३६ किलो ३६० ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ हा दोन ट्रॅव्हलिंग बॅगामध्ये ठेवल्याचे आढळून आले.‌ या तरुणासोबत त्याचा आणखी एक साथीदार असल्याची माहिती प्राप्त झाली असून, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansbha Election : महाविकास आघाडीचं ठरेना… अजूनही १७ जागांवर तिढा कायम; फायनल यादी कधी येणार?

सुंदर विषय तरीही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; प्रियांकाच्या 'पाणी'ने २ दिवसात किती केली कमाई?

Ranji Trophy: 15 Sixes! जम्मू-काश्मीरच्या अब्दुल समदने एकाच सामन्यात ठोकल्या दोन सेंच्युरी, मोठ्या विक्रमालाही गवसणी

Diwali Snack 2024: दिवाळीसाठी बनवा कुरकुरीत अन् स्वादिष्ट मुरमुऱ्यांचा चिवडा, पाहा व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 ऑक्टोबरला भरणार अर्ज

SCROLL FOR NEXT