education news school welcome student from june 15 school start student back home pune  Sakal
पुणे

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये ‘प्रवेशोत्सव’!

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी राबविणार शोध मोहीम

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : उन्हाळ्याच्या सुटीनंतर आता विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण व्हावी, यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार ‘प्रवेशोत्सव’ देखील साजरा करण्यात येणार आहे. तसेच शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधी घेण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचे नियमित शाळेत येणे बंद होते. या काळात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत झाले असल्याबाबत स्पष्टता दिसून येत नाही. तसेच, शाळांमधील शैक्षणिक सोयी-सुविधांमध्ये सुद्धा अस्ताव्यस्त झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विद्यार्थी मात्र प्रत्यक्षात शाळेत येण्यास १५ जून, तर विदर्भात २७ जून रोजी प्रारंभ होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित असल्याचे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता पहिली ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक राहणार आहे.

शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्तिशः: किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्‌बोधन आणि प्रबोधन करावे. विद्यार्थ्यांचे स्वागत फूल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्त्रोतमध्ये उपलब्ध उपयोगी सामग्री देऊन करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक ठेवण्याबाबत मार्गदर्शन करावे, तसेच शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे, माजी शिक्षक, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे, अशा सूचना मांढरे यांनी शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना दिल्या आहेत.

तसेच, मागील दोन वर्षात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसल्याने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, सदस्य, पालक व शिक्षक यांचेशी चर्चा करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्‌बोधन व सहकार्य करावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम

शाळेच्या परिसरातील ६ ते १४ वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करावी. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधीमध्ये घ्यावा आणि शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत. शाळेजवळील परिसरातील दगडखाणी, वीटभट्टी, बांधकामांची ठिकाणे, उद्याने, बाजारपेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या यांसारख्या ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे, असे स्पष्ट आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT