Rahul Shrirame Sakal
पुणे

पुण्यातील पार्किंगची ठिकाणे वाढविण्याचे प्रयत्न; राहुल श्रीरामे

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने भेडसावत आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतूक काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने भेडसावत आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतूक काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होईल.

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये वाहतूक कोंडीची (Traffic Issue) समस्या सातत्याने भेडसावत आहे. रस्त्यांची कामे (Road Work) पूर्ण झाल्यानंतर वाहतूक काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होईल. पार्किंग (Parking) सुविधांचा अभाव हेदेखील वाहतूक कोंडीचे कारण आहे. त्या दृष्टीने महापालिका (Municipal) व वाहतूक शाखेकडून मध्यवर्ती भागात पार्किंगच्या नव्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होऊ शकेल, असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे (Rahul Shrirame) यांनी स्पष्ट केले.

श्रीरामे यांनी ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी शहराचा मध्यवर्ती भाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी, वाहनचालकांवरील दंडात्मक कारवाई, लोकअदालतीमध्ये तडजोड न होण्याचा प्रकार यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता या प्रमुख रस्त्यांवर महापालिकेकडून विकासकामे सुरू आहेत. तेथील खोदकामामुळे रस्ता अजून अरुंद झाला आहे. तसेच सणासुदीला खरेदीसाठी येणाऱ्यांच्या वाहनांना पार्किंग मिळत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी मध्यवर्ती भागातील आठ रस्त्यांची निवड केली आहे. तेथे महापालिकेच्या सहकार्याने नवीन पार्किंगची ठिकाणे शोधत आहोत. तेथे ऑनलाइन बुकिंगद्वारे आगाऊ नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही बदल केले आहेत, त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्यास मदत होईल. हेल्मेटबाबत जनजागृती केल्यानंतर हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण ३२ टक्क्यांनी वाढले. मात्र कारवाईनंतर हेच प्रमाण ६७ टक्‍क्‍यांवर गेले.

छुप्या पद्धतीने कारवाई करणाऱ्या पोलिसांवर लक्ष

वाहतूक पोलिस चौकात नियमन करण्याऐवजी रस्त्याच्या बाजूला थांबून दंडाच्या पावत्या फाडत असल्याच्या तक्रारी येतात. वाहतूक पोलिसांकडून गर्दीच्या वेळी वाहतूक नियमनाला प्राधान्य दिले जाते. त्यानंतरच्या वेळेत उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तरीही छुप्या पद्धतीने कारवाई करण्याच्या प्रकारावर लक्ष ठेवून योग्य दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आकडे बोलतात

  • ४८ लाख शहरातील वाहनांची एकूण संख्या

  • ९८० वाहतूक पोलिसांची संख्या

  • १७८ एक लाख लोकसंख्येमागे पोलिस

  • २३ एक लाख लोकसंख्येमागे वाहतूक पोलिस

  • ३६१ शहरातील एकूण चौक

  • २६१ सिग्नल यंत्रणा

  • २३१ सुरू असलेले सिग्नल १ कोटी १८ लाख रुपये लोकअदालतीमुळे वसूल झालेला दंड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील सद्यःस्थिती

  • गर्दीच्या वेळी औंध, बाणेर, पाषाणकडून शिवाजीनगरकडे येणारी वाहने - १५ हजार

  • (औंधहून येणारी वाहने ७-८ हजार, पाषाण-बाणेरकडून येणारी प्रत्येकी ४-४- हजार वाहने)

  • गर्दीच्या वेळी शिवाजीनगरकडून औंध, बाणेर, पाषाणकडे जाणारी वाहने - ११ हजार

  • (औंध व बाणेकडे जाणारी वाहने प्रत्येकी ४ हजार, पाषाणकडे जाणारी वाहने अडीच हजार)

  • दिवसात चौकातून जाणाऱ्या वाहनांची संख्या - दोन लाख ८१ हजार

  • वाहतुकीसाठी सध्या असलेला रस्ता - ३६ मीटर (प्रत्यक्षात २६ मीटरच उपलब्ध)

  • उड्डाण पुल, मेट्रोच्या कामासाठी जाणारा रस्ता - १२ मीटर

  • उपलब्ध होणारा रस्ता - २४ मीटर

श्रीरामे म्हणाले...

  • वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्हीचा उपयोग

  • सिग्नल सिंक्रोनायझेशनसाठी प्रयत्नशील

  • सीसीटीव्हीवरील कारवाईसाठी एटीएमएस कॅमेऱ्यांचा वापर

  • रस्ते सुरक्षा सप्ताहाअंतर्गत नागरिकांना मदत करण्यावर भर

रस्ते बंद करण्याचा प्रकार थांबणार

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर खोदकामामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन संकष्ट चतुर्थी व अन्य सणांच्यावेळी हा रस्ता बंद करावा लागत होता. रस्ता पूर्ववत झाल्यानंतर वाहतुकीसाठी तो बंद ठेवण्याची वेळ येणार नाही. तरीही त्या-त्या वेळीची गरज लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतले जातील, असे श्रीरामे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT