पुणे - सायबर गुन्ह्यांमुळे नागरिकांची बचत व गुंतवणूक एका क्षणात नष्ट होत आहे. हा धोका संपूर्ण जगाला संभवत आहे. भविष्यात हे गुन्हे कमी करण्यासाठी भारताच्या मदतीने अमेरिका सायबर सिक्युरीटीबाबत एक परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी दिली.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) व अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत यांच्यामध्ये सायबर सिक्युरीटीबाबत काही महिन्यांपूर्वी सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारा अंतर्गत होणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी गार्सेटी यांनी ‘एमसीसीआयए’ला सोमवारी (ता. २०) भेट दिली.
या वेळी त्यांनी सायबर सिक्युरीटीसंदर्भात दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या सहकार्यावर प्रकाश टाकला. ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबने, सायबर सिक्युरीटीच्या राज्याच्या विभागाच्या पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यावेळी उपस्थित होत्या.
‘तंत्रज्ञानाप्रमाणेच सायबर सिक्युरीटी हा रोजच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. नागरिकांनी हे आता लक्षात घेऊन सायबर सिक्युरीटीकडे लक्ष द्यायला हवे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात गेल्या वर्षात एक कोटींहून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सायबर गुन्हे करणाऱ्यांना कोणत्याही सीमा नसल्याने जगातल्या कोणत्याही भागातून पैसे, डेटा, माहिती चोरी करण्याचे आणि व्यवस्था बंद पाडण्याचे प्रकार घडत आहेत.
हा धोका आता प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावतोय. यातून अनेक भेद निर्माण होत असून, दोन देशांमधले संबंधही खराब होऊ शकतात. यामुळेच भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश सायबर सिक्युरीटीबाबत संपूर्ण जगाला उपयुक्त ठरेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ असे गार्सेटी यांनी सांगितले.
‘सायबर चोरट्यांकडून हेलिकॉप्टरची खरेदी’
‘सायबर फिशिंगसाठी गाजलेल्या जामतारा गावातील दोन चोरट्यांनी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत या गावातील लोकांकडून आलिशान चारचाकी खरेदी केल्या जात असल्याची माहिती होती. आता त्यांची मजल हेलिकॉप्टरपर्यंत पोहचली आहे,’ असे यादव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.