सासवड नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील इलेक्ट्रिकल चारचाकी व दुचाकी वाहनांचा महामेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
सासवड - सासवड नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील इलेक्ट्रिकल चारचाकी व दुचाकी वाहनांचा महामेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. माझी वसुंधरेच्या जल, भूमी, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्वाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रचार, प्रसार व लोकजागृतीसाठी सासवड नगरपरिषद कायम तत्पर राहत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अगोदर इलेक्ट्रिकल दुचाकींच्या रॅलीचे आयोजन केले होते. तर आता इलेक्ट्रिकल वाहनांचा मेळावा व ती वापरणारांचा सन्मानपत्र देत सन्मान सोहळा नगरपरीषदेच्या प्रांगणात झाला.
यावेळी नगरपरीषदेच्या प्रांगणात इलेक्ट्रीकल व्हेईकल मेळाव्यात 3 चारचाकी वाहनांनी आणि ५५ इलेक्ट्रीकल दुचाकींनी सहभाग नोंदविला. महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. यामध्ये धनश्री सोनावणे, डॉ.सुप्रिया गद्रे, स्नेहलता बोरावके, स्वाती भारती, सुरेखा जाधव, श्रीमती खळदकर आदि अनेक महिला दुचाकींसह सहभाग झाल्या होत्या. या माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत इलेक्ट्रीकल महामेळयामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व वाहन धारकांना सासवड नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी श्री. मोरे यांच्यासह नगरपरिषद कार्यालय अधीक्षक संदेश मांगडे, आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण, पाणी पुरवठा अभियंता रामानंद कळस्कर, वरिष्ठ लिपीक संजय पवार, शहर स्वच्छता समन्वयक राम कारंडे, माजी नगरसेवक अजित जगताप, निवृत्त बँक अधिकारी हेमंत ताकवले, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गिरमे, मोहनआण्णा जगताप, सुनिलनाना जगताप, चेतन महाजन, संदिप जगताप, भूषण मचाले, अमित बहिरट, रवि पोटे, संजय उर्फ मंत्री जगताप व नगरपरिषद कर्मचारी तसेच शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे मार्गदर्शनात म्हणाले., शहरातील जास्तीत जास्त नागरीकांनी इलेक्ट्रीकल वाहनांचा वापर करावा. त्यासाठी नगरपरिषदेच्यामार्फत जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरविण्यात येतील. यामध्ये सामाजिक दायित्व निधीद्वारे (सीएसआर) जबाबदारी म्हणून सोलर चार्जिंग पॉईंट बसविणेत येणार आहे. अगोदर दोन ठिकाणी चार्जिंग पॉईंट बसविले आहेत. त्यात भर घातली जाईल. त्याचा मोफत फायदा इलेक्ट्रीकल वाहन चार्जिंगसाठी होणार आहे. तसेच शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या सर्व इमारतींवर सोलर यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
सोलर सिटी व इलेक्ट्रीकल वाहनांची सिटी म्हणून सासवड शहराची वाटचाल करण्यावर भर आहे. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अपारंपारिक उर्जा स्रोतांचा वापर शहरातील नागरिकांनी करावा. आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण यांनी पर्यावरणपूरक घोषणा देऊन सांगितले की., पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा. नागरिकांना पुन्हा आव्हान आहे की, अलीकडे सासवड शहर हद्दीत नदी परिसर, सोनोरीमार्ग, वाघडोंगर व सोपानगर मार्ग व लगतच्या मोकळ्या जागांत कचरा उघड्यावर गुपचुप टाकण्याचे प्रकार दिसतात.
ज्यांची घंटागाडीची वेळ चुकते, त्यांनी विशेषतः याबाबत खबरदारी घ्यावी आणि कचरा संकलीत करुन घंटागाडीतच कचरा टाकावा. अन्यथा संबंधितांवर एक हजार रुपयांप्रमाणे प्रत्येक वेळी दंड आकारण्यात येईल. त्यासाठी फिरती पथके तयार केली आहेत. नगरपरीषदेचे शहर स्वच्छता समन्वयक राम कारंडे यानिमित्त म्हणाले., सासवड शहर स्वच्छता स्पर्धेत देशपातळीवर गेली चार वर्षे चमकदार कामगिरी करीत आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी व विविध अस्थापनांनी आपले वास्तु व परिसर नित्यपणे स्वच्छ ठेवावा. शिवाय सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा.
'वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन करणे, ही प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे आणि ते वृक्ष जगविणे म्हत्वाचे व आवश्यक आहे. याबाबत शाळा, महाविद्यालयातून आणि विविध कार्यालयात सातत्याने मार्गदर्शन शिक्षक वर्गाने आणि अधिकाऱयांनी केले पाहिजे. तसेच माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत यंदा शासनाने धोरण ठरवून दिल्याने समाजातील महिला व तरुण वर्गाने अधिकचा सहभाग द्यावा.'
- निखील मोरे, मुख्याधिकारी - सासवड नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.