पुणे

आंबेगाव, जुन्नर तालुक्यात महावितरणचे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

डी.के वळसे-पाटील

मंचर : आंबेगाव जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने तडाखा दिल्यामुळे बुधवारी दुपारपासून वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, 50 अधिकारी व 600 कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत.

दोन्ही तालुक्यातील सात वीज उपकेंद्रातील वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे . पण वीज केंद्रापासून पुढे शहरे व गावांना वीज पुरवठा सुरू होण्यासाठी काम सुरू दुपारपर्यंत मंचर, नारायणगाव, जुन्नर, घोडेगाव या शहरातील काही भागांचा वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाऊस पडत असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे.उर्वरीत 29 विज उपकेंद्रातील वीज पुरवठा सुरू होण्यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी रात्र अंधारातच काढली. नळ पाणीपुरवठा योजना पिठाच्या गिरण्या बंद आहेत. लॉकडाऊन व निसर्गाच्या संकटामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने दळणवळण न बंद पडले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, महावितरणचे प्रमुख तांत्रिक संचालक साबू व महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. दर दोन तासांनी वळसे-पाटील कामकाजाचा आढावा घेत आहेत. त्यामुळे कामाला गती आली आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मदत व्हावी म्हणून महावितरण कंपनीला स्थानिक पातळीवर खाजगी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंबेगाव जुन्नर विभागाचे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे यांच्या सहाय्यक अभियंता  अभियंते व 600 जन मित्र रात्रभर काम करत हातात बॅटरी घेऊन त्यांनी तुटलेल्या वाहिन्या व विजेचे खांबाची ची पाहणी करून सकाळ पासूनच दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील मंचर रांजणी, पिंपळगाव ,व जुन्नर तालुक्‍यातील खोड द ,पिंपळवंडी ,हिवरे ,आळे ही एकूण सात वीज उपकेंद्र सकाळी सुरू करण्यात महावितरण कंपनीला यश आले आहे  उर्वरित 29 उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फुरसुंगी येथे वाहिन्या, विजेचे खांब व उपकरणे आणण्यासाठी वाहने पाठविण्यात आले आहेत. दुपारपर्यंत साहित्य आल्यानंतर कामाला गती येईल असे महावितरणकडून सांगण्यात आले.गरज पडल्यास अन्य जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मदत घेण्याचे नियोजन हे महावितरण कंपनीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT