पुणे : जगातील सर्वश्रीमंतांपैकी एक एलॉन मस्क (Elon Musk) आपल्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचं एक ट्विट हे शेअर बाजारात मोठी उलथापालथ घडवून आणण्याच्या ताकदीचं असतं. याचा प्रत्यय अनेकदा याआधी आलेला आहे. एलॉन मस्क नेहमीच आपल्या फॉलोवर्सना रिप्लाय देण्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत. मात्र, आता एलॉन मस्क यांनी चक्क आपल्या पुण्यातील (Pune-based engineer) एका इंजिनिअरच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. एलॉन मस्क यांनी या पुणेकर इंजिनिअरला इंटर्नशीपचा कशाप्रकारे फायदा झाला, याबाबत माहिती दिली आहे. (Elon Musk replies to Pune-based engineer's tweet)
प्रणय पाठोळे या पुणेकर इंजिनिअरने एका ट्विटमध्ये मस्क यांच्याबद्दल ट्विट केलं होतं. यात त्याने म्हटलं होतं की, टेस्ला मोटर्सचे CEO एलॉन मस्क यांना तरुण वयातच कशापद्धतीने समजलं होतं की, एका बँकेकडून दुसर्या बँकेत पैसे ऑनलाइन पाठवण्यासाठी मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही.
जेव्हा एलॉन मस्क 18 वर्षांचा होता, तेंव्हा त्याने नोव्हा स्कॉशिया बँकेत इंटर्नशिप केली होती. तिथेच त्यांना समजले की एका बँकेकडून दुसर्या बँकेत पैसे पाठवण्यासाठी आपल्याला मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता नसते. पाठोळे यांच्या या ट्विटला लगेचच एलॉन मस्क यांचा रिप्लाय आला. या ट्विटमध्ये मस्कने इंटर्नशिपच्या सहाय्याने अनुभव आणि ज्ञान कसे मिळवले याबाबत सांगितले. बॅथ ऑफ नोव्हा स्कॉशिया येथे मस्कच्या इंटर्नशिपच्या संदर्भात पाठोळे यांनी हे ट्विट केलं होतं. त्यावर मस्कने प्रतिक्रिया दिली की बँकेचे वरिष्ठ कार्यकारी पीटर निकल्सन यांच्याबरोबर काम करताना त्यांना आनंद मिळाला असला तरी त्यांच्यासाठी लक्षावधी डॉलर्सच्या लवादाची संधी (multi-billion dollar arbitrage opportunity) शोधूनही त्याला वाढ मिळाली नव्हती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.