Emphasis on infrastructure in border areas of country Lt Gen Rajeev Chaudhary Provision of 15 thousand crores  sakal
पुणे

Pune : देशाच्या सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांवर भर; लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी

येत्या आर्थिक वर्षात १५ हजार कोटी रुपयांची तरतूद, लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी

अक्षता पवार

पुणे : सीमा रस्ता संघटनेद्वारे (बीआरओ) देशाच्या सीमावर्ती भागात रस्ते, पूल, बोगदे आदींचे मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. यामध्ये उत्तरेकडील आणि ईशान्येकडील सीमांवर सर्वाधिक कामे केली जाते आहेत.

सीमावर्ती भागात सुरक्षेच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षात अत्यंत महत्त्वाचे रस्ते, बोगदे आणि पूल साकारण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षात बीआरओद्वारे या कामांसाठी येणारा खर्च हा ६ हजार कोटी रुपयांवरून ९ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. या येणाऱ्या आर्थिक वर्षात ते १५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. अशी माहिती सीमा रस्ते महासंचालक (डीजीबीआर) लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी दिली.

लष्कराच्या हालचाली तसेच दुर्गम भागात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने बीआरओ कार्यरत असून संघटनेद्वारे ६४ वा स्थापना दिन साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बीआरओतर्फे पुण्यात ‘मुख्य अभियंता आणि उपकरणे व्यवस्थापन परिषद’ आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

परिषदे संदर्भात माहिती देताना लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बीआरओद्वारे केल्या जाणाऱ्या कामांची माहिती देताना ते म्हणाले, ‘‘उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती पाहता बीआरओने सशस्त्र दलांसाठी बरेच धोरणात्मक प्रकल्प पूर्ण केले आहेत.

तर ईशान्येकडील स्थिती पाहता पर्यावरणपूरक बांधकाम, रस्ता सुरक्षा पैलू व कामगारांसाठी सुविधांमध्ये बदल करण्यासह मानवी संसाधन उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत २०५ प्रकल्पांसाठी तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा वाटा देण्यात आला आहे.

इतकेच नाही लष्कराला कठीण भूप्रदेशात येणाऱ्या आव्हानांना कमी करण्यासाठी अनेक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. बीआरओच्या वतीने एकता इव्हान श्रद्धांजली अभियान राबविण्यात येत असून यामध्ये बीआरओच्या पथकांद्वारे देशाच्या विविध सीमावर्ती भागातून पाणी, माती व रोपांचे १०८ नमुने आणून त्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

स्थलांतरित परतले

सीमावर्ती परिसरात असलेल्या दुर्गम भागात पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे स्थानिकांना उत्पन्न, नोकरी, अन्न अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे स्थलांतराचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला होता. इतकेच नाही तर काही भागात केवळ ५० ते ८० लोकांचीच संख्या उरली होती.

ज्यामध्ये लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. रस्ते हा विकासाचा कणा आहे. रस्ता तयार झाल्यानंतर वीज, दळणवळण, शाळा, रुग्णालये व इतर पायाभूत सुविधा देखील उपलब्ध होण्यास चालना मिळते. हे लाभ अशा भागातील नागरिकांना मिळावा म्हणून बीआरओद्वारे रस्ते, पूल आदी तयार करण्यात आले. यामुळे गावांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यात आल्याने स्थलांतरित पुन्हा आपापल्या गावी परतल्याचे ही आमच्या निदर्शनास आल्याचे चौधरी यांनी नमूद केले.

बीआरओची कामगिरी

- सध्याच्या घडीला १२ बोगद्याचे काम सुरू असून लवकरच ‘शिंकू ला’ बोगद्याचे काम सुरू होणार

- अरुणाचल प्रदेशमधील महत्त्वाकांक्षी अशा ‘सेला’ बोगद्याचे काम जूनपर्यंत पूर्ण

- २०२१ मध्ये ८७ पूल आणि १५ रस्त्यांचे प्रकल्प

- तर २०२२ मध्ये १०३ प्रकल्पांचे काम

- बीआरओच्‍या प्रकल्पांच्या मूल्यांसाठी जेम प्रमाणपत्र

- बीआरओला जी-२० परिषदेत ‘जेम’चे महत्त्व दाखवण्याची संधी मिळाली

- मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा बीआरओच्या खर्चाचे बजेट तिप्पट वाढले आहे.

- जीएस कॅपिटल हेड अंतर्गत बीआरओला देण्यात आलेल्या निधीत १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे

- बागडोगरा आणि बराकपूर एअरफील्डवर काम सुरू

- न्योमा एअरफील्डचे काम देखील लवकरच सुरू होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT