पुणे

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षणावर भर द्यावा : डॉ. गोऱ्हे

CD

पुणे, ता. १५ : ‘‘बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासोबत शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासोबत पाल्य आणि पालकांच्या प्रशिक्षणावर भर द्यावा, तसेच वाहतूक नियोजन आणि रस्ता सुरक्षेबाबतही आवश्यक उपाययोजना कराव्यात,’’ असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, बालगुन्हेगारी आणि ससून रुग्णालयातील व्यवस्थापनाबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त सुनील रामानंद, पिंपरी - चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक सुजित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘बाल न्याय कायद्यानुसार गंभीर गुन्ह्याबाबत कारवाई करताना गुन्हेगारांना प्रौढ समजण्यात यावे. यादृष्टीने नियमांचा अभ्यास करून कार्यप्रणाली निश्चित करण्याचा प्रयत्न करावा.’’

नारनवरे म्हणाले, ‘‘बाल न्याय कायद्यानुसार बालगुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यावर भर देण्यात आला आहे.’’ भोसले म्हणाले, ‘‘अनधिकृत हॉटेल आणि रुफ टॉप हॉटेलवर महापालिकेतर्फे कारवाई केली असून शहरातील पदपथावरील आणि रस्त्याच्या बाजूला असलेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू केली आहे. नियमबाह्य जाहिरात फलकांवर देखील कारवाई करण्यात येत आहे.’’

अमितेश कुमार म्हणाले, ‘‘वाहतूक सुरक्षेबाबत मागील १५ दिवसांत पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली असून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.’’ डॉ. म्हस्के म्हणाले, ‘‘ससून रुग्णालयाच्या कामकाजात पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी आदर्श प्रणाली निश्चित केली आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT