Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sakal
पुणे

शिवनेरीच्या पायथ्याशी बसविण्यात येणार शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा

जुन्नर नगरपालिकेच्या हद्दीतील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचरस्ता चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा बसविण्यात येणार आहे.

प्रशांत पाटील

जुन्नर नगरपालिकेच्या हद्दीतील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचरस्ता चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा बसविण्यात येणार आहे.

कात्रज - जुन्नर नगरपालिकेच्या हद्दीतील शिवनेरी किल्ल्याच्या (Shivneri Fort) पायथ्याशी (Foot) असणाऱ्या पाचरस्ता चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वरुढ पुतळा (Statue) बसविण्यात येणार आहे. हा पुतळा ब्राँझ धातूपासून बनविण्यात आला असून पुतळ्याची निर्मीती गुजर-निंबाळकरवाडीतील खेडकर स्टुडिओमध्ये शिल्पकार निलेश खेडकर आणि श्रीराज खेडकर यांनी केली आहे. जुन्नर नगरपालिकेकडून मार्च २०२१ मध्ये या पुतळ्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर खेडकर यांनी ८ ते १० कामगारांच्या मदतीने जुलै २०२१मध्ये पुतळ्याचे काम सुरु करुन मार्च २०२२ मध्ये पूर्ण केले आहे.

किल्ल्याच्या पायथ्याशी पाचरस्ता चौकात महाराजांचा जुना आणि छोटो पुतळा होता. मात्र, शिवजन्मभूमीला साजेसा असा भव्यदिव्य पुतळा याठिकाणी असावा असा मानस जुन्नर शहरवासियांचा होता. तो पूर्ण करण्याच्या हेतूने नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सर्व शासकीय परवानग्या घेऊन कामाचे आदेश देण्यात आले. त्यानुसार महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवून तयार करण्यात आला आहे.

तसेच, याठिकाणी पुतळ्यासाठी २६ लाख रुपये खर्च करुन चबुतरा बांधण्यात आला आहे. लवकरच या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, शहर अभियंता विवेक देशमुख, नगरसेवक समीर भगत, लक्ष्मीकांत कुंभार, नरेंद्र तांबोळी, सुनील ढोबळे, अक्षय मांडवे, नगरसेविका अलका फुलपगार, अंकिता गोसावी, मोनाली म्हस्के, कविता गुंजाळ, हजरा इनामदार, सुवर्णा बनकर, अश्विनी गवळी उपस्थित होते.

  • पुतळ्याची उंची - १५ फूट

  • पुतळ्याची रुंदी - १६ फूट

  • पुतळ्याचे वजन - ३.५ टन

  • पुतळा बनविण्याचा कालावधी - ८ महिने

  • एकूण खर्च - २९ लाख

प्रतिक्रिया

या व्यवसायात मी ५० वर्षांपासून काम करत आहे. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे १६ अश्वारूढ पुतळे बनविण्याचे काम केले आहे. आतापर्यंत बनिविलेल्या पुतळ्यांपैकी हा सर्वात मोठा पुतळा असून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे महाराजांच्या जन्मस्थानी आपण बनवलेला पुतळा बसविण्याचे भाग्य आम्हाला लाभल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत.

- शिल्पकार निलेश खेडकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT