पुणे : पुण्याच्या प्रधान नियंत्रक संरक्षण लेखा कार्यालयाच्या (पीसीडीए) परिसरात गुरुवारी (ता.२२) ‘टी-55 टॅंक' या युद्धस्मारकाची स्थापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण लेखा विभागाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक संजीव मित्तल यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले. पीसीडीएचे डॉ. निरुपमा काजला, मयंक शर्मा, एनडीएएसचे संचालक मिहीर कुमार आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुण्यातील पीसीडीए ही केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या (वित्त) अखत्यारीतील संरक्षण लेखा विभाग (डीएडी) या संस्थेची पथदर्शी संघटना आहे. या संघटनेकडे भारतीय लष्करातील 53 हजाराहूनपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते देणे तसेच, पूर्व लेखा परीक्षण अशा जबाबदारी आहेत.
यावेळी बोलतांना संजीव मित्तल म्हणाले, "पीसीडीएच्या (ओ) कार्यालय परिसरात ‘टी-55 टॅंक' या युद्धस्मारकाची स्थापना होणे, हे लष्कर आणि संरक्षण लेखा विभागातील एकात्मीकृत भावनेचे प्रतीक आहे. लष्कराने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना संरक्षण लेखा विभाग दाखवत असलेली कार्यक्षमता महत्वाची आहे.
"पीसीडी(ओ)च्या कार्यालयात, 'टी-55 टॅंक' या युद्धस्मारकाची स्थापना होणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे स्मारक आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील आणि आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करेल. कोरोनाच्या काळातही पीसीडीए मार्फत देशभरातील लष्करी अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ता, तसेच निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे थकीत मानधन वेळेत देण्याचे कार्य करण्यात आले होते. तसेच भविष्यातही लष्करी अधिकाऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी पीसीडीए नेहमी तत्पर असेल," असे डॉ. काजला यांनी सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.