कोथरूड मध्ये राहणाऱ्या ६ वर्षीय अरिष्का लड्ढा या चिमुकलीने एव्हरेस्ट बेस कॅम्प वर यशस्वी चढाई केली.
कोथरूड - कोथरूड मध्ये राहणाऱ्या ६ वर्षीय अरिष्का लड्ढा या चिमुकलीने एव्हरेस्ट बेस कॅम्प वर यशस्वी चढाई केली. असा ट्रेक करणारी अरिष्का ही सर्वात तरुण भारतीय मुलगी ठरली असल्याचा दावा तीच्या कुटूंबियांनी केला आहे. अल्पिनिस्ट या एव्हरेस्ट वीर भगवान चावले यांच्या ट्रेकिंग ग्रुप मध्ये ती सहभागी झाली होती.
आरिष्का कौस्तुभ लड्ढा हिचे वय अवघे ६ वर्षे ५ महिने आहे. अरिष्काच्या आधी आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियातील माया ब्रिस्टो आणि इंग्लंडमधील ऍश्लीन मॅन्ड्रिक या फक्त 2 मुलींनी हा ट्रेक केला आहे, त्या दोघांचे वय 6 वर्षे होते.
ट्रेकिंगसोबतच अरिष्का स्केटिंग आणि रनिंगही करते. ती बावधन येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. ट्रेकिंग मुळे राहिलेला अभ्यास पुर्ण करण्यासाठी शाळेने अतिरिक्त शिक्षणाची व्यवस्था केली आहे.
आरिष्का 8 एप्रिलला काठमांडूला पोहोचली. 9 एप्रिलला तीने ट्रेकिंगला सुरुवात केली, 8 दिवसांचा ट्रेक केल्यानंतर आणि 65 किमी अंतर कापून 16 एप्रिलला एव्हरेस्ट बेस कॅम्पला किमान उणे17 डिग्री सेल्सिअस आणि दिवसाचे कमाल तापमान उणे 3 डिग्री से. असताना तीने यशस्वीपणे हा ट्रेक पुर्ण केला. 17 एप्रिलला परतीचा ट्रेक सुरू केला आणि 20 एप्रिलला काठमांडूला पोहोचली. पुण्यातील 8 जणांचा ग्रुप या कॅम्पमध्ये सहभागी होता.
या आधी सिंहगडावर आरिष्काने ट्रेकचा सराव केला होता. गेल्या नोव्हेंबरमध्ये 12000 फूट उंचीवर असलेल्या तुंगानाथला गेली होती.
आरिष्का ची आई डिंपल लड्डा या मॅरेथॉन धावपटू, सायकलस्वार आणि ट्रेकर आहेत. 150 किमीची एन्ड्युरो शर्यत देखील जिंकली आहे. वडील कौस्तुभ लड्ढा यांना खेळात फारसा रस नसला तरी ते त्यासाठी प्रोत्साहन देतात.
डिंपल लड्डा म्हणाल्या की, मला आनंद आणि अभिमान आहे की मी आणि माझी 6 वर्षांची मुलगी अरिष्का हिने उणे 15 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानात 11 दिवसांत 130 + 10 किमिचा एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
या पराक्रमासह एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करणारी अरिष्का लड्ढा ही सर्वात तरुण भारतीय मुलगी ठरली आहे. आम्ही दररोज दहा बारा किमी चढाई करायचो. या काळात आमचे 10 दिवसांचे दुपारचे आणि रात्रीचे जेवण शाकाहारी डाळ भात असे होते: बेस कॅम्पवर पोहोचण्यापूर्वी आरिष्काला दोन दिवस अगोदर 7 थरांचे कपडे घालायला लावले. शूजच्या आत मोज्यांचे 3 थर होते. चव आणि आरोग्यासाठी सोबत तुपाची बाटली घेऊन गेलो होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.