medical service Sakal
पुणे

माजी सैनिकांना आता वैद्यकीय सेवांचा मिळणार लाभ

दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक, लघु सेवेतील अधिकारी (एसएससी) आणि वेळेआधीच सेवानिवृत्त होणाऱ्या माजी सैनिकांना आता वैद्यकीय सेवांचा लाभ मिळणार.

अक्षता पवार

दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक, लघु सेवेतील अधिकारी (एसएससी) आणि वेळेआधीच सेवानिवृत्त होणाऱ्या माजी सैनिकांना आता वैद्यकीय सेवांचा लाभ मिळणार.

पुणे - दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक, लघु सेवेतील अधिकारी (एसएससी) आणि वेळेआधीच सेवानिवृत्त होणाऱ्या माजी सैनिकांना आता वैद्यकीय सेवांचा लाभ मिळणार आहे. माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना विभागाच्या (ईसीएचएस) वतीने या माजी सैनिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

ईसीएचएस विभागामार्फत माजी सैनिक, त्यांचे कुटुंब आणि विधवांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. परंतु यात काही श्रेणीतील माजी सैनिकांना हा लाभ मिळत नव्हता. यामध्ये दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक, लघु सेवेतील निवृत्त अधिकारी, वेळेआधी सेवानिवृत्ती झालेले जवान आदींचा समावेश आहे. मात्र २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने या श्रेणीतील माजी सैनिकांना ईसीएचएस अंतर्गत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मंजुरी दिली. यामुळे आतापर्यंत ईसीएचएस सेवेच्या लाभापासून वंचित असलेल्या ४० ते ५० हजार माजी सैनिक आणि अधिकाऱ्यांना देशभरातील ४०० हून अधिक ईसीएचएस पॉलिक्लिनिक, ईसीएचएस अंतर्गत येणाऱ्या अडीच हजारांपेक्षा जास्त खासगी रुग्णालये आणि सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये काही अटीनुसार वैद्यकीय सेवांचा लाभ मिळण्यास सुरवात झाली. परंतु अद्याप याबाबत अनेकांना शंका असून काहींना याबाबत माहिती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ईसीएचएस विभागाला यासंबंधी अनेकवेळा या श्रेणीतील माजी सैनिकांकडून आरोग्य सेवांशी निगडित प्रश्‍न विचारले जातात. याबाबत माजी सैनिकांना माहिती मिळावी या अनुषंगाने ईसीएचएस मार्फत या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

अशी मिळणार लाभ

- संबंधित माजी सैनिकांना ईसीएचएस पॉलिक्लिनिकमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांची बाहेरून खरेदी केल्यास औषधांच्या खर्चाचा संपूर्ण परतावा मिळणार

- यासाठी ५० किंवा ७० टक्के परताव्याची अट नसेल

- ईसीएचएस पॉलिक्लिनिकद्वारे मोफत ओपीडी सेवा

- ईसीएचएस पॉलिक्लिनिकमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांची बाहेरून खरेदी केल्यास त्याचा संपूर्ण खर्चाचा परतावा

- मात्र शस्त्रक्रिया किंवा इतर गंभीर आजारांचे ईसीएचएसने नेमलेल्या रुग्णालयात उपचार घेताना येणाऱ्या खर्चासाठी काही अटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Latest Maharashtra News Updates : सत्तास्थापनेनंतर पहिलाच निर्णय 'लाडकी बहिणीं'चे पैसे वाढवणार?

IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचा विजय अन् पाकिस्तानला धक्का; Jasprit Bumrah ने मोडला कपिल देव यांचा विक्रम, ७ मोठे पराक्रम

Eknath Shinde: शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंची मागाठाणेत हॅट्‌ट्रिक, जाणून घ्या विजयाची इनसाइड स्टोरी

Sangli Election Results : पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात? खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यापैकी एकाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT