Traffic Sakal
पुणे

Khadakwasla News : परीक्षांच्या काळात वाहतूक नियोजन ‘फेल’; सात किलोमीटर साठी लागला तासभर

पीएमपीएमएल बसने कोंढवे- धावडे‌ ते कर्वेनगर‌‌ असे सात किलोमीटर जाण्यास ३०- ३५ मिनीटे लागतात. वाहतूक कोंडीमुळे आज सुमारे एक तास लागला.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - पीएमपीएमएल बसने कोंढवे-धावडे‌ ते कर्वेनगर‌‌ असे सात किलोमीटर जाण्यास ३०- ३५ मिनीटे लागतात. वाहतूक कोंडीमुळे आज सुमारे एक तास लागला. बारावीच्या मंडळाच्या परीक्षा आज सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना परीक्षेला मनःस्ताप सहन‌ करावा लागला.

त्याचे‌ झाले असे की, बारावीचा आज पहिला पेपर होता परीक्षा विद्यार्थ्यांना मंडळाने दहा वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगितले आहे. आणि साडेदहा वाजता उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येते. त्यानुसार, उशीर होऊ नये म्हणून विद्यार्थी‌ नऊ वाजता पीएमपीएमएल बसने‌ निघाले‌. परंतू ‌उत्तमनगर, शिवणे येथील नवभारत चौक, शिंदे पूल, न्यू अहिरे गाव, गणपती माथा, माळवाडीचा नवीन थांबा, चौधरी शाळेसमोरील थांबा, आंबेडकर चौक, या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

यामुळे, विद्यार्थ्यांना कर्वेनगर येथील सिद्धिविनायक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास ३५ मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सांगितले की, न्यूअहिरे गाव या ठिकाणी, मोठी वाहतूक कोंडी पहावयास मिळाली. बस व्यतिरिक्त कार दुचाकी, रिक्षा या वाहनाने देखील‌ विद्यार्थी निघाले होते त्यांनाही केंद्रावर पोचण्यास वेळ लागला.

गणपती माथा ते माळवाडी जुना बसथांबा, कालव्यावरील रस्ता चौक, माळवाडीचा युनियन बँके जवळील नवीन थांबा, चौधरी शाळेजवळ येथे देखील वाहतूक संथ झाली होती. वाहतूक पोलिस एक ठिकाणी होती. परीक्षेच्या पहिल्या दिवशी वाहतूक कोंडी झाल्यामुळे, वाहनांचा वेध संथ झाला होता. नेहमीपेक्षा आज जास्त वेळ लागला. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी कोंढवे धावडे ते डेक्कन वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. असे मागणी पालक नितीन वांजळे यांनी केली‌ आहे.

याबाबत, वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक काडबाणे‌ यांनी सांगितले की, १० वी १२ वीच्या परीक्षा असल्यामुळे वरिष्ठांच्या सूचना आलेल्या आहेत. गणपती‌ माथा ‌येथे‌ वाहतूक कोंडी झाली. याची माहिती मिळाली ती काढण्यात आली तसेच आम्ही चौकांमध्ये वाहतूक नियमन करीत होतो. उद्यापासून परीक्षेच्या दिवशी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच सूचना सर्व कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.

शिवणे येथील दांगटपाटील नगर ते कर्वेनगर हे अंतर दुचाकीवरून जाण्यासाठी देखील अर्धा तास वेळ लागला. शिवणे येथील शिंदे पूल, येथे नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी होती. गणपती माथा ते‌आंबेडकर चौकापर्यंत वाहतूक पूर्णपणे हळूहळू पुढे सरकत होती. परीक्षा असल्याने अनेक पालक विद्यार्थी यावेळी परीक्षा केंद्रावर जाताना दिसत होते. परीक्षेच्या काळात वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करावे. शिवणे येथील पालक ललित दांगट यांनी केली.

उद्या गुरुवारी सकाळी एक अधिकारी, दहा पोलीस अंमलदार आणि चार ट्राफिक वॉर्डन यांना सकाळी मुलांच्या परीक्षेच्या वेळी उशीर होऊ नये. याकरिता सकाळी आठ वाजल्यापासून नेमण्यात आलेले आहे. सर्व बंदोबस्तातील लोकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. यावेळी नागरिकांनी देखील सहकार्याची आवश्यकता आहे.

- दीपक काडबाणे‌, सहायक पोलिस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT