पुणे - पाषाण रस्त्यावर रस्ते खोदाई प्रकरणात एक कनिष्ठ अभियंता निलंबित झाल्यानंतर आता या ठिकाणी खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराला ८ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच भविष्यात काम करायचे असल्याने परवानगी घेणे बंधनकारक आहे असेही ठेकेदाराला बजावण्यात आले आहे.
समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ठेकेदाराकडून नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. अभिमानश्री सोसायटीकडून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथ विभागाने नव्याने डांबरीकरण केले होते. त्यानंतर काही दिवसातच या रस्त्यावर खोदकाम झाल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या पाहणी दौऱ्यात निदर्शनास आले. यावेळी ढाकणे यांनी चौकशी केली असता त्यांची कनिष्ठ अभियंत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे या अभियंत्याचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे. नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर विनापरवाना खोदाई करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने पथ विभागाने पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला ८ लाख ७७ हजार ८२४ रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुदत उलटल्यानंतर केले काम
पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री चौक या रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला परवानगी देण्यात आली होती. पण ३१ ऑक्टोबर पूर्वी हे काम पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन करणे आवश्यक होते. पण या ठेकेदाराने मुदत उलटून गेल्यानंतर अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना दिली नाही. तसेच नव्याने रस्ता केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा रस्ता खोदला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असे पथ विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.