पुणे :''देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. त्याच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करला लसीकरण सुरू आहे. त्याच वेळी आता ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्यांनाही यात लस देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही ज्येष्ठ नागरिक ऑनलाईन नोंदणी करत आहेत तर काही स्वत: केंद्रावर जाऊन नोंदणी करत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीकरणाचा अनुभव कसा होता, लस घेतल्यानंतर काय त्रास जाणवल्या याता खास आढावा सकाळने घेतला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरु झाल्यानंतर ज्योती गोडबोले (वय 65) आणि त्यांचे पती अजित वसंत गोडबोले (71) यांनी 1 मार्चला पहिल्याच दिवशी पुण्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. याबाबत बोलताना ज्योती गोडबोले म्हणाल्या, ''मी पेपरमध्ये ज्येष्ठनागरिकांना लस मिळणार अशी बातमी वाचली. त्यानंतर कोव्हिन वेबसाईटद्वारे आम्ही नाव नोंदणी केली. बी जे मेडिकल कॉलेजमध्ये दिवसभरात लसीकरण होईल असे समजले. 11 वाजता आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा मोठी रांग होती. जसे जसे लोक येतील त्या प्रमाणे नाव, नंबर, आणि ओळखपत्र दाखवून प्रत्येकाला नंबर दिले होते. लसीकरणाचा पहिलाच दिवस असल्याने केंद्रावर काही वेळ गोंधळ सुरू होता. ते पोर्टल ओपन होत नसल्याने आम्ही बराच वेळ बसून होतो. शेवटी आम्ही घरी परत गेलो. त्यानंतर आम्ही 3 वाजता पुन्हा केंद्रावर गेलो. सकाळी नाव नोंदणी झाल्यामुळे आम्हाला त्यांनी लगेच आत घेतले. त्यानंतर आमचे 'बॉडी टेम्प्रेचर' आणि 'ऑक्सिजन लेव्हल' चेक केले. तसेच तिथे आमचे तीन वेळा 'आयडेंटी व्हेरीफिकेशन' केले. आम्हाला लस दिली. त्यानंतर आम्हाला जवळपास 20 मिनिटे थांबवले होते. आतमध्ये खूप चांगली व्यवस्था होती. सगळीकडे खूप स्वच्छता होती. आम्हाला खूप चांगली सेवा मिळाली. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आम्हाला 29 मार्चला पुन्हा बोलवले आहे. आम्ही कोणत्याही केंद्रावर लस घेऊ शकतो असेही त्यांनी आम्हाला सांगितले होते. लस घेतल्यानंतर आम्हाला काहीच त्रास जाणवला नाही.''
पुण्यात 18 वर्षावरील सर्वांना सरसकट लस द्या; कोरोना नियंत्रण आढावा बैठकीची शिफारस
नाशिकमध्ये कविता मालपाठक (57) आणि जयकृष्ण मालपाठक (58) या दाम्पत्याने 7 मार्चला लस घेतली आहे. दोघांनाही सहव्याधी असल्याने फॅमिली डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट घ्यावे लागले. याबाबत बोलताना, कविता मालपाठक म्हणाल्या, ''आम्ही महात्मा नगरमध्ये सिक्स सिग्मामध्ये प्रत्यक्ष जाऊन नोंदणी केली. त्यावेळी आधार कार्ड आणि मेडिकल सर्टिफिकेट दाखवून आमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. त्यासाठी प्रत्येकी 250 रुपये त्यांनी शुल्क आकारले. त्यानंतर आम्हाला लगेच लस देण्यात आली. लस घेताना आम्हाला कोणताही त्रास जाणवला नाही. तिथली सर्व व्यवस्था एकदम चांगली होती. त्यानंतर दिवसभर नेहमीची काम केली. पण, रात्री मला थंडी आणि ताप जाणवू लागला आणि डोकही प्रंचड दुखत होते. लस घेतली तो हातही दिवसभर दुखत होता. सकाळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी क्रोसीन घेतली. त्यानंतर माझा त्रास कमी झाला.आता मला कोणताही त्रास होत नाही.'' त्याचवेळी सोबत लस घेतलेल्या जयकृष्ण मालपाठक यांना कोणताही त्रास झाला नसल्याचं कविता यांनी सांगितलं.
लसीकरणासाठी अशी करा नावनोंदणी
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लसीकरणासाठी अत्यावश्यक कागदपत्रे
लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्याल
पुण्यात कोणत्या वेळेला काय सुरु, काय बंद? जाणून घ्या सविस्तर नियमावली
लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी
लस घेतल्यानंतर होणारे किरकोळ त्रास
''देशात 2 कोटींपेक्षा लोकांना लस मिळाली असून कोणालाही गंभीर त्रास जाणवाला नाही, त्यामुळे ही लस सुरक्षित आहे. लस सर्वांनी घेणे आवश्यक आहे. ज्यांना सहव्याधी आहे आणि त्या व्याधी जरी नियंत्रणात नसतील तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर बरोबर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा.''
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.