पुणे : देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) प्रबळ दावेदार असलेले सेवा क्षेत्र कोरोनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 2018 मध्ये देशातील 31.45 टक्के कर्मचारी या क्षेत्रात कार्यरत होते. आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, बॅंकिंग अशा महत्त्वपूर्ण सेवांनी अंतर्भूत असलेल्या या क्षेत्रात कोविड-19 नंतर मोठी वाढ होणार आहे. त्यासाठी या क्षेत्राला संशोधन आणि विकासाचा (आर ऍन्ड डी) बूस्टर डोस मिळायला हवे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहे.
इंडिया ब्रांड इक्विटी फाउंडेशनच्या (आयबीइएफ) वतीने नुकताच देशातील संशोधन आणि विकासासंबंधी एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामध्येही ही गरज व्यक्त केली आहे. कोरोनामूळे बदललेली कामाची पद्धत, लोकांची कमी झालेली क्रयशक्ती आणि आर्थिक बाबींवर झालेला परिणाम बघता उत्पादनाधारीत उद्योग आणि कंपन्यांसाठी पुढील कालावधी कठीण असणार आहे. त्यातूलनेत मध्यम आणि लघु उद्योग, सेवा क्षेत्रासाठी ही एक प्रकारची संधी असणार आहे. परंतु नवी जीवनपद्धती आणि लोकांच्या गरजा किफायतशीर पद्धतीने भागविणाऱ्या सेवा देण्यासाठी नव संशोधन आणि विकास ही गुरुकिल्ली ठरणार आहे.
आणखी वाचा - धक्कादायक : पुण्यात हुक्क्याचीही होतेय होम डिलिव्हरी!
सेवा क्षेत्राचा आर्थिक पसारा
- देशाच्या अर्थव्यवस्थेतील 'की ड्रायव्हर'
- 2018-19मध्ये अर्थव्यवस्थेतील एकूण मूल्याच्या (ग्रॉस व्हॅल्यू) 54.17 टक्के वाटा
- एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 मध्ये 181.20 अब्ज डॉलरची निर्यात आणि 112.09 अब्ज डॉलरची आयात
- देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक या क्षेत्रात होते
- डिसेंबर 2019 ते एप्रिल 2000 मध्ये 80.67 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक
- वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात वाढ, 2020 पर्यंत 9 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा
'आर ऍन्ड डी'ची आवश्यकता का?
- सेवा क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करणे
- कोरोनामुळे सेवांचे डिजीटलायझेशन होणार
- ऑनलाइन सेवांमध्ये होणार वाढ, त्यामुळे पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ उभे करणे
- सेवांच्या अत्याधुनिकीकरणासाठी संयंत्रे, सॉफ्टवेअर आदींमध्ये आवश्यक संशोधन
- निर्माण होणाऱ्या डेटाची सुरक्षितता, पृथ्थकरण आणि विश्लेषण करणे
- विकेंद्रीकरण पद्धतीने सेवांचे संचालन आणि व्यवस्थापन करणे
सेवा क्षेत्रातील जमेच्या बाजू
1) जोरदार मागणी :
- वाढत्या मध्यमवर्गामुळे सेवांच्या मागणीत वाढ होत आहे. मध्यमवर्ग टेक्नॉसॅव्ही झाल्यामुळे सेवांचे व्यवस्थापनात वाढ.
2) आकर्षक संधी :
- आयटी क्षेत्रातील सर्वात मोठा निर्यातदार, जगातील तिसरे मोठे औषधनिर्माण क्षेत्र आणि वेगाने वाढणारा करारबद्ध संशोधनाचे क्षेत्र
- मूलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकी मधील शोध निबंध प्रकाशित करण्यामध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानावर
3) धोरणांची साथ :
- संशोधन आणि विकासासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपचा (पीपीई) मोठा फायदा होणार
- 2013 मधील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना योजना
- स्वामित्व हक्क 1970 मध्ये सुधारणा
4) वाढते खासगी क्षेत्र :
- खासगी उद्योग आणि कंपन्यांसह स्टार्टअपमध्ये संशोधन आणि विकासासाठीच्या गुंतवणुकीत वाढ होत आहे.
वैज्ञानिक आणि तांत्रिक मनुष्यबळाच्या बाबतीत भारत : जगात 3 क्रमांकावर
- विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठे : 162
- प्रति वर्ष विज्ञान आणि तंत्रज्ञानात डॉक्टरेट होणाऱ्यांची संख्या : 4 हजार
- प्रति वर्ष विज्ञानातील पदव्युत्तर : 35 हजार
- 2020-21 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात संशोधन क्षेत्रातील तरतूद : 6 हजार 302 कोटी
- 2022 पर्यंत जीडीपीतील वाटा (सरकारचा संकल्प) : 2 टक्के
संशोधने आणि विकासात भारतातील गुंतवणूक
1) सर्व क्षेत्रातील गुंतवणूक
वर्ष : गुंतवणूक (अब्ज डॉलर)
2019 : 94.06
2018 : 86.24
2) वैद्यकीय क्षेत्रातील अंदाज
2022 : 9.6
2020 : 7.8
2017 : 5.7
संशोधन आणि विकासातील जागतिक केंद्र म्हणून भारताला उभे करावे लागेल. त्यासाठी पुर्णवेळ संशोधकांसह उद्योगांची भागिदारी आपल्याला वाढवावी लागेल. त्यासंबंधीचे कायदे आणि कराच्या रचनेतही बदल करावे लागतील.
- डॉ. व्ही.के.सारस्वत, सदस्य, निती आयोग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.