Agriculture Loan Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील पावणेदोन लाख शेतकऱ्यांना पीककर्ज

पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७४ हजार ९७४ शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७४ हजार ९७४ शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा (Agriculture Loan) लाभ घेतला आहे. या सर्व शेतकऱ्यांना (Farmer) मिळून आतापर्यंत एकूण १ हजार ३५५ कोटी ५७ लाख १३ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप (Loan Distribution) केले आहे. सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रासाठी हे कर्ज वाटप झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. (Farmer Agriculture Loan in Pune District)

पुणे जिल्ह्यातील कर्ज वाटपाचे हे प्रमाण खरिपातील कर्ज वाटपाच्या एकूण उद्दिष्टाच्या ७६.१७ टक्के एवढे झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०१ कोटी ३५ लाख ७८ हजार रुपयांचे जास्तीचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. गेल्या आजअखेरपर्यंत १ हजार ५४ कोटी ३८ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण झाले होते. कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ६३.७७ टक्के पूर्ण झाले होते. यंदा कोरोनामुळे कर्ज वाटपावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती. परंतु याउलट घडले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक ताणाताण वाढल्याने शेतकरी पीककर्जाकडे वळला असावा, असा अंदाज बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने (पीडीसीसी) जून २०२० च्या मध्यापर्यंत १ लाख ३६ हजार ६६२ शेतकऱ्यांना एक हजार ५४ कोटी ३८ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्जाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत ३८ हजार ३१२ ने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत १ लाख ३६ हजार ६६२ शेतकऱ्यांनी पीककर्जाचा लाभ घेतला होता, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी खरीप पीक कर्जाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा बॅंकेने घेतली आहे. यानुसार कर्जाची मागणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना यापुढेही येत्या ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पिकांसाठी कर्ज वाटप केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा कर्ज मागणीत वाढ झाली आहे.

- रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT