Farmer Daughter Purva wagh Wins Gold at Khelo India National Kho-Kho Championship Sakal
पुणे

Khelo India : शेतकऱ्याची कन्या पूर्वा ची खेलो इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

आई-वडिलांना शेतात मदत करता करता शिक्षणाचे धडे तर गिरवलेच शिवाय मैदानावरही चमकदार कामगिरी करत खेलो इंडिया राष्ट्रीय महिला खो खो लीग स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

नवनाथ भेके

निरगुडसर : आई-वडिलांना शेतात मदत करता करता शिक्षणाचे धडे तर गिरवलेच शिवाय मैदानावरही चमकदार कामगिरी करत खेलो इंडिया राष्ट्रीय महिला खो खो लीग स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. पूर्वाने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी दोन महिन्यात दोन सुवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.

रांजणी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील विजय व स्वाती वाघ यांची पूर्वा वाघ ही द्वितीय कन्या पहिली चैताली आणि तिसरी ऋतिका तिन्ही मुलीचं ..पण मुलांपेक्षा कमी नाही खो-खो खेळा बरोबर शिक्षणातही तरबेज आहेत.

त्यातील पूर्वा हीच शालेय शिक्षण पहिली ते चौथी रांजणी जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाल्यानंतर पाचवीला रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालयात प्रवेश घेतला आणि वयाच्या ११ व्या वर्षापासून खो खो खेळण्यास सुरुवात केली त्यानंतर कोरोना आला तरी सरावामध्ये मध्ये खंड पडू दिला नाही,

अशामध्ये शालेय राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत १४ व १७ वर्षाखालील दोन्ही स्पर्धेत कांस्य पदक पटकावले त्यानंतर शेतात आई वडिलांना मदत करता करता शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले आणि खेळाचा सरावही केला,

सकाळ संध्याकाळ मेहनत करून सराव केला आणि पहिल्या यंदाच्या वर्षी छत्तीसगड येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली आणि निवड सार्थ ठरवत तिने पहिल्या सुवर्ण पदकाला गवसणी घातली त्यानंतर भारतीय खेल प्राधिकरण व भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने ८ मार्च ते १० मार्च २०२४ या कालावधीत स्पोर्ट्स ग्राउंड चौगन स्टेडियम,

जयपुर राजस्थान येथे खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खो खो लीग १८ वर्षाखालील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वा वाघ हीचा महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये सहभाग होता. पूर्वा वाघ हिच्या चमकदार कामगिरीने महाराष्ट्र राज्य संघाने उपांत्य फेरीत हरियाणा तर अंतिम फेरीत राजस्थानचा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पूर्वा सध्या इयत्ता नववी मध्ये नरसिंह विद्यालयात शिक्षण घेत असून ती नरसिंह क्रीडा मंडळाची खेळाडू आहे.

पूर्वाला राष्ट्रीय खो खो प्रशिक्षक संदीप चव्हाण आणि क्रीडा शिक्षक राजू तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. पूर्वाने सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल विद्यालय आणि आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी तिच्या स्वागत प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी दुंडे स्कूल कमिटीचे सदस्य मधुकर हांडे, एकनाथ नाना भोर,

बंडेश वाघ, पर्यवेक्षक राजेंद्र पडवळ, रमेश भोर , विजय वाघ,अरुण कानसकर उपस्थित होते. चौकट: पूर्वा वाघ म्हणाली की, सध्या मी नववी मध्ये शिक्षण घेत असून दिवसभर अभ्यास आणि सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रात खो खो सराव करत आहे,या मेहनतीमुळे मला राष्ट्रीय खो खो स्पर्धेत यश मिळाले असून यापुढेही खूप मेहनत घेणार आहे.मला पुढे प्रशासकीय अधिकारी होण्याचे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

Prakash Ambedkar: निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

SCROLL FOR NEXT