Pune Rain News  sakal
पुणे

Pune Rain News : अतिवृष्टीने खानूत शेतकऱ्याचे घर जमिनदोस्त; एका वासराचा मृत्यू, इतर जनावरे जखमी तर अन्नधान्याची नासाडी

महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा झाला असल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे : दुर्गम पानशेत भागातील खानू गावातील राघू काळू कोरपड(ढेबे ) या शेतकऱ्याचे घर रविवार (ता.०१) रोजी पहाटेच्या कोसळले. यात शेतकरी व त्याचे कुटूंब थोडक्यात बचावले असून एका वासराचा मृत्यू झाला आहे. तर इतर जनावरे जखमी झाली आहेत दरम्यान महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा झाला असल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसापासून पानशेत धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने दुर्गम ग्रामीण भागातील कुडा मेडीचे घर असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. राघू कोरपड (ढेबे ) यांचे घर सुद्धा कुडा मेडीचे व छप्पर केंबळाचे व गवताचे आहे पावसाचा जोर जास्त असल्याने हे घर कोलमडून जमीन दोस्त झाले आहे.

घर जमीन दोस्त झाले सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी जीवित हानी झाली नाही एका वासराचा मृत्यू झाली असल्याची माहिती समोर येत असून पाच ते सहा जनावरे घराच्या ढिगाऱ्याखाली आडकले होते.त्यात जनावरे गंभीर जखमी झाले आहेत.याचबरोबर वर्षभर साठवून ठेवलेले धान्य भिजून चिखल झाले असून त्याची नासाडी झाली आहे.

ऐन पावसाळ्यात डोक्यावरचे छप्पर गेल्याने ढेबे कुटूंबावर मोठे संकट कोसळले असून उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान या प्रकारची माहीती मिळताच तहसिलदार दिनेश पारगे यांनी तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी पंचनामाच्या सूचना दिल्यानंतर वेल्हे पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद काटवटे,तलाठी किलवरे, एस. डी. सोरटे पशुधन पर्यवेक्षक वाजेघर बुद्रुक ,अनिकेत शिंदे पशुधन पर्यवेक्षक पानशेत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

यावेळी यशवंत सेना तालुका अध्यक्ष शंकर ढेबे, माजी सरपंच संतोष कोकरे, पोलीस पाटील विलास कोकरे ,बबन कोकरे, किसन कोकरे, आदी उपस्थित होते.

ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असून यात शेतकरी सुदैवाने वाचले आहेत.शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाला माहीती दिली आहे.लवकरात लवकर या शेतकऱ्याला शासनाने मदत करावी.

- संतोष कोकरे,माजी सरपंच खानू (ता.वेल्हे)

पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अशा घटना घडत आहे.माहीती मिळताच स्थानिकांच्या मदतीने पीडीत शेतकऱ्याला ताबोडतोब मदत केली.संबंधित प्रशासनाला कळवले आहे.

- विलास कोकरे, पोलीस पाटील खानू (ता.वेल्हे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray यांची बोंबाबोंब म्हणजे 'चोर के दाढी में तीनका', नेमकं कुणी केली अशी टीका?

Bombay High Court : तेलगोटे कुटुंबीयांची फाशीची शिक्षा रद्द, वडील-मुलाला सुनावली जन्मठेप,आईची निर्दोष सुटका

Arjun Tendulkar च्या संघाचा विक्रम! Ranji Trophy च्या ९० वर्षांच्या इतिहासात कुणीच केला नव्हता असा पराक्रम

Ulhasnagar Assembly Election : आयलानी यांचा जीव भांड्यात! योगी आदित्यनाथ यांची मीरा भाईंदरच्या सभेतून कुमार आयलानी यांच्यासाठी हाक

Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT