farmer was seriously injured after an electric wire fell on him in Shingve Ambegaon Taluka  
पुणे

देव तारी त्याला कोण मारी...विजेचा शॉक लागून शेतकरी जखमी

नवनाथ भेके

निरगुडसर : उसाला तणनाशक फवारणी करत असताना शेतकरी संदीप देवराम गोरडे यांचा डाव्या बाजूच्या मानेवर अचानक विजेची तार कोसळल्याने अपघात झाला. यात ते सुदैवाने बचावले, देव तारी कोण मारी याची प्रचिती त्यांना आली. तसेच लाईन ट्रीप होऊन वीज बंद झाल्याने मोठा अनर्थ टळला तरी देखील वीजेचा शॉक बसल्याने मानेचा काही भाजल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील गोरडे मळ्यात सोमवार (ता.१० )रोजी घडली.

शिंगवे गावाजवळ असणाऱ्या गोरडे मळ्यात संदीप देवराम गोरडे यांची शेती आहे,शेतीमधील उसाची फवारणी करण्यासाठी ते आपला मुलगा वेदांत सोबत गेले होते. सोमवारी सकाळी उसाची फवारणी करत असताना अचानक गाढवेमळ्यातून गोरडे मळ्याकडे जाणारी विजेची तार संदीप गोरडे यांच्या डाव्या बाजूच्या मानेवर पडल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला, सुदैवाने येणारी लाईट देखील ट्रीप होऊन बंद झाली. तसेच तार मानेच्या बाजूला न जाता डाव्या बाजूला खांदा, हाताच्या बाजूला गेल्याने मोठा अनर्थ टळला आणि शेतकऱ्याचा जीव वाचला आहे.

यावेळी मुलगा वेदांत याने तातडीने फोन द्वारे अनेकांना संपर्क करून घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी पारगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉ.आशिष चव्हाण म्हणाले की, संदीप गोरडे यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांच्या मानेचा काही भाग जळालेला आहे तसेच डाव्या बाजूचा खांद्याला मार लागल्याने सूज आली आहे. निरगुडसर वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता दीपक देशमुख म्हणाले की,दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे हा अपघात झाला असावा हा अपघात झाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचून दुरुस्ती केली आणि वीज प्रवाह सुरळीत केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT