Milk Rate: sakal
पुणे

Milk Rate:दूध खरेदी दर वाढीसाठी शेतकऱ्यांची ‘दूध दिंडी’; करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Pune Update: येत्या १ जुलैला कृषी दिनापासून शिखर शिंगणापूर येथून दिंडी सुरु करणार

सकाळ वृत्तसेवा

Doodh Dindi: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान ४० रुपये खरेदी दर देण्यात यावा, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांनी ‘दूध दिंडी’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही दूध दिंडी येत्या कृषी दिनापासून (ता.१ जुलै) सुरु केली जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरपासून या दिंडीला सुरुवात केली जाणार आहे. ही दूध दिंडी पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधिस्थळी नेण्यात येणार असून, तेथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात धवलक्रांतीच्या माध्यमातून दुधाचा पूर आणला आहे. पण शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत अद्याप हीही बदल झालेला नाही. याउलट दुधाला योग्य दर मिळत नसल्याने, दूध उत्पादक शेतकरी कर्जात बुडाले आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी महिना किंवा दोन महिन्यांच्या कालावधीसाठी दूध अनुदान देऊन उपयोग नाही. ही केवळ मलमपट्टी आहे. त्यामुळे दूध दराच्या बाबतीत कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी दूध धोरण असणे गरजेचे असल्याचे मत दूध उत्पादक शेतकरी व विविध शेतकरी संघटनांनी व्यक्त केले आहे.

शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी याआधी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मंत्रालयात जाऊन विविध 10 मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला दिले होते. यामध्ये दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्यात यावे, जसा दुधाला उत्पादन खर्चावर आधारित १५ टक्के नफा आहे. उसाला रास्त आणि किफायतशीर भाव (एफ.आर.पी.) निश्‍चित केलेला आहे.

त्याच धर्तीवर दुधाचाही रास्त व किफायतशीर भाव निश्‍चित करण्यात यावा. मूल्यवर्धन नफा वाटप केला जावा, दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करण्यात यावी, पशुखाद्य व पशू औषधांचे दर नियंत्रित करावेत, कायद्याचे कवच देण्यात यावे आणि दूध भेसळखोरांवर कडक कारवाई कऱण्यात यावी, मिल्कोमीटर व वजन काट्यांद्वारे केली जाणारी दूध उत्पादकांची लूटमार थांबविण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.

फलटण येथील पहिलवान खंडू खर्चे, इंदापूर तालुक्यातील बावडा येथील हरी पवार, पुणे येथील सतीश देशमुख, पुरंदर तालुक्यातील नीरा येथील महेश जेधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दूध दिंडीचे आयोजन केले आहे.

दूध दिंडी दृष्टीक्षेपात

- येत्या कृषिदिनी नी (ता.१ जुलै) पहाटे पाच वाजता शिखर शिंगणापूर येथून सुरुवात

- त्याच दिवशी दुपारी गोरक्षनाथ गडमार्गे मुक्कामासाठी राहुरीला जाणार

- दुसऱ्या दिवशी सकाळी राहुरी येथून पदमश्री विठ्ठलराव विखे समाधिस्थळी जाणार

- पदमश्री विठ्ठलराव विखे समाधिस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

SCROLL FOR NEXT