farmers water discharge from ghod dam to agriculture Ashok Pawar Sakal
पुणे

Pune News : घोड धरणातून शेतीसाठी आवर्तन शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

पाणी जपून वापरण्याचे आमदार ॲड्. अशोक पवार यांचे आवाहन

दत्तात्रेय कदम

मांडवगण फराटा : शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी घोड धरणातून आवर्तन सोडण्यात आले. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार, माजी मंत्री बबनराव पाचपुते व शिरूर - हवेलीचे आमदार ॲड्. अशोक पवार यांच्या हस्ते घोड उजवा कालवा व डावा कालवा यांमधून आवर्तनाचा शुभारंभ करण्यात आला.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नामदार दिलीप वळसे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार अशोक पवार, पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच कालवा समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पुण्यात काल बैठक घेण्यात आली होती. कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आज हे आवर्तन सोडण्यात आले.

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, मांडवगण फराटा, भैरू फराटे वाडी, इनामगाव, तांदळी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील लाभक्षेत्रातील बोरी, हंगेवाडी, मढेवडगाव, श्रीगोंदा कारखाना, अजनूज, शेडगाव, पेडगाव आदी गावांमधील दहा ते बारा हजार हेक्टर वरील पिकांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.

पावसाने ओढ दिल्याने या परिसरातील पिके पाण्याअभावी जळून चालली होती. शेतीच्या तसेच जनावरांच्या व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर ऐन गरजेच्या वेळी घोड धरणातून सुमारे एक टीएमसी पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून सोडण्यात येत असल्याने या परिसरातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

"दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धरणात पाणीसाठा कमी असतानाही शेतकर्‍यांची हातातोंडाशी आलेली पिके जळून जाऊ नयेत यासाठी, तसेच काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. हे २५ दिवसांचे आवर्तन असून शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरावे." असे आवाहन शिरूर - हवेलीचे आमदार ॲड् अशोक पवार यांनी यावेळी बोलताना केले.

याप्रसंगी भगवानराव पाचपुते, घोडगंगाचे संचालक संभाजी फराटे, नरेंद्र माने, माजी संचालक दत्तात्रेय फराटे, लतिका जगताप, शंकरराव फराटे, विठ्ठलराव काकडे, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते, शिरसगावच्या सरपंच मनिषा जाधव, रमेश माने, शैलेश घाडगे, खंडेराव फराटे, सचिन मचाले,

हनुमंत तांबे, विष्णूपंत वाबळे, काकासो मोहिते, निलेश कोंडे, पोपट चव्हाण, कुंडलिक शितोळे, अंबादास बोरकर, विकास जगताप, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी मारुती ठणके, कार्यकारी अभियंता किरण देशमुख, कनिष्ठ अभियंता अजय वाघ, स्नेहा पावरा, सहायक अभियंता जितेंद्र प्रजापती, शाखाधिकारी किरण तळपे, नाना पवार व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शंकरराव फराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT