Pune Accident News in marathi esakal
पुणे

Pune Accident: अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी कंपनीत हाफ डे केला...पण नियतिचा घात, ट्रॅक्टरला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू

सागर आव्हाड - सकाळ वृत्तसेवा

पुणे: एंगेजमेंट अ‍ॅनिवर्सरी साजरी करण्यासाठी कंपनीतून दुपारून सुट्टी घेऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. पुणे - सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरात दुचाकीने पाठीमागून ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ऋषिकेश विजय गायकवाड (वय- 27, रा. गोसावी वस्ती, आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कामासाठी बसने ये-जा करणारा तरुण-

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा मांजरी येथील नामांकित सिरम या कंपनीत कामाला होता. तर, त्याचे वडील हे टेल्को या कंपनीत कामाला आहेत. ऋषिकेश याचा मागील तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. कामावर तो रोज बसने ये-जा करीत होता. आज एंगेजमेंट अ‍ॅनिवर्सरी साजरी करण्यासाठी ऋषिकेश याने दुपारून सुट्टी घेतली होती. तसेच आज तो दुचाकी घेऊन कंपनीत आला होता.

भीषण अपघात आणि मृत्यू-

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल या ठिकाणी उरुळी कांचनच्या बाजूने जात असताना समोर असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ऋषिकेश याच्या डोक्याला व अंगावर मोठ्या जखमा झाल्या होत्या. दरम्यान, त्याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर-

अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच ऋषिकेश याचे लग्न झाले होते. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण, पत्नी, असा परिवार आहे. या अपघातामुळे ऋषिकेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: 'या' दिवशी करता येणार पुणेकरांना शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोनं प्रवास, PM मोदींच्या हस्ते व्हर्चुअली होणार लोकार्पण

Bangladeshi Women Mumbai: कागदपत्रे तर बनावट होतीच पण... आठ बांगलादेशी महिलांना मुंबईतून अटक

Raghuram Rajan: रघुराम राजन यांनी मोदी सरकारचे केले कौतुक; म्हणाले, गेल्या 10 वर्षात...

IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटी विलंबाने सुरू होणार; BCCI ने सांगितली वेळ, तरीही घोळ होणार

Indira Ekadashi 2024: पितृ पक्षात इंदिरा एकादशी 27 की 28 सप्टेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT